IPL 2021 रद्द झाल्यानंतर Virat Kohli करतोय 'हे' काम, पाहा फोटो
Virat Kohli (Photo Credit: Instagram)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाचा भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर (IPL 2021) मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, अनेक खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीबीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्पर्धेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आयपीएलचे उर्वरित सामने कधी खेळवले जाणार आहेत? याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे वाईस प्रेसिडेन्ट राजीव शुक्ला यांनी दिली आहे.

आयपीएलची स्पर्धा रद्द झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर तो कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करणार आहे, असे अनुष्का म्हणाली आहे. हे देखील वाचा- दिल्लीच्या छात्रसाल स्टेडियमबाहेर भारतीय युवा कुस्तीपटूला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; पोलीस चौकशी सुरू

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul.N.Kanal (@rahulnarainkanal)

शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांनी सोशल मीडियावर विराट सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच विराट कोहलीने कोरोना विरोधात समाज कार्य करण्यास सुरु केल्याची त्यांनी सांगितले आहे. अलीकडेच अनुष्का आणि विराट कोहली यांनी केलेल्या एका वक्तव्यात असे म्हटले होते की, कोरोना लढ्यात योगदान देण्यासाठी आम्ही पुढे आलो असून लवकरच याबाबात माहिती देऊ असे सांगितले होते. तसेच कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने काळजी घ्या, असेही आवाहन त्यांनी केले होते.