दिल्लीच्या (Delhi) छात्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) कुस्तीपटूंच्या दोन गटात हाणामारी झाली असून त्यामध्ये एका पैलवानचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रसाल स्डेडिअमच्या बाहेर कुस्तीपटूंमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, घटनास्थळी पोहचताच पोलिसांना काही कुस्तीपटू जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. ज्यामुळे क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कुमार असे मृत कुस्तीपटूचे नाव आहे. जखमी अवस्थेत असताना त्याला बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला ट्रामा सेंटर येथे नेण्यात आले. परंतु, बुधवारी सकाळी त्याचा मृत्यु झाला आहे. तर, याप्रकरणाशी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा-IPL 2021 Suspended: आयपीएल 14 स्थगित केल्याने ‘या’ 3 संघांना झाला सर्वाधिक फायदा, घेतला असेल सुटकेचा नि:श्वास
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून या घटनेत ती ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू सुशील कुमारच्या भूमिकेबाबतही तपास करत आहे. मात्र, बुधवारी सुशील कुमारने या घटनेवर वृत्तसंस्थेतील एएनआयवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान तो म्हणाला की, छत्रसाल स्टेडियमच्या कुस्तीपटूंचा या भांडणाशी काही संबंध नाही. काही अज्ञात लोकांनी स्टेडियमच्या आवारात उडी मारुन लढाई सुरू केली. तो आमचा कुस्तीपटू नव्हता. ही घटना काल रात्री उशिरा घडली. आम्ही पोलिसांना अशी माहिती दिली होती की काही अज्ञात लोक आमच्या आवारात उडी घेऊन भांडत आहेत. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही, असेही तो म्हणाला आहे.