Virat Kohli-Anushka Sharma च्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला मिळाले मोठे यश, 24 तासांच्या आत जमा झाले 3.6 कोटी रुपये
Anushka Sharma And Virat Kohli (Photo Credits: Instagram)

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याचा उपक्रम सुरु केला होता. कालच या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करुन अनुष्का आणि विराटने याबाबत माहिती दिली होती. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या उपक्रमाची घोषणा होऊन 24 तास व्हायच्या आत यात 3.6 कोटी रुपये जमा झाले आहेत. अनुष्काने याबाबत सर्वांचे आभार मानत ट्विट केले आहे. या ऑनलाईन फंड रेसरच्या मदतीने 7 कोटी जमा करण्याचा या दोघांचा उद्देश आहे.

अनुष्काने आपल्या चाहत्यांचे आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले आहेत. "मी त्या सर्वांची आभारी आहे, ज्यांनी या उपक्रमात अमूल्य योगदान दिले आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण अर्धा रस्ता बनवला आहे. याच मार्गाने आपण पुढे जाऊ" असेही तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- COVID-19 ग्रस्तांच्या मदतीसाठी विराट कोहली-अनुष्का शर्माने सुरु केली खास मोहीम, व्हिडिओ शेअर करून केली मदतीची अपील

अनुष्का 'एक्ट ग्रांटस' आणि 'किटो' फंड रेसरच्या मदतीने पैसे जमा करत आहेत. अनुष्का आणि विराट कोहलीने स्वत: या फंड रेसरसाठी 2 कोटी रुपये दिले आहेत. या पैशांनी ते गरजूंना ऑक्सिजन कंसन्ट्रेटर्स, औषधे आणि अन्य सुविधा देणार आहेत.

अलीकडेच IPL 2021 रद्द झाल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सामाजिक कार्याला लागले आहेत.