Virat Kohli Injury Update: फिल्डिंग दरम्यान विराट कोहली दुखापतग्रस्त, 5व्या टी-20 सामन्यातून होणार का कॅप्टनची सुट्टी? वाचा सविस्तर
विराट कोहली, भारत-ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: PTI)

Virat Kohli Injury Update: अहमदाबाद (Ahmedabad) येथे गुरुवारी झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) बाजी मारली आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. यादरम्यान, यजमान संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतग्रस्त झाला आणि 15व्या ओव्हरनंतर मैदान सोडून बाहेर पडला. मिड-विकेट दरम्यान फिल्डिंग करताना कोहलीला दुखापत झाली आणि दुसरी धाव थांबवण्याच्या अयशस्वी प्रयत्नात त्याने आपला संतुलन गमावला. कोहली मैदानाबाहेर गेला तेव्हा रोहित शर्माने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली. 5 सामन्यांची मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारताने 8 धावांनी विजय मिळवल्याच्यानंतर विराट मैदानावर येताना लंगडताना दिसत होता. पण त्याची दुखापत गंभीर नसून 20 मार्च रोजी होणाऱ्या मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी तो बरा होईल, असे कोहली म्हणाला. (IND vs ENG 4th T20I 2021: ‘स्पष्टपणे रणनीती कामी आली’! Michael Vaughan यांची रोहित शर्माला कॅप्टन्सी देण्याच्या ‘विराट’ निर्णयावर मोठी प्रतिक्रिया)

“मी बॉलसाठी पळत गेलो, डाईव्ह केली आणि मी ते फेकले, म्हणून मी कदाचित सर्वोत्तम स्थितीत नव्हतो. मी आऊटफील्डच्या बाहेर पडलो, आधी मी अंतर्गत रिंगमध्ये होतो. आणि तापमान खूपच कमी होते, जेणेकरून आपले शरीर ताठ होते. म्हणून मी फक्त माझ्या वरच्या चतुष्पादाला थोडा त्रास दिला आणि मला ते एक निगल किंवा दुखापत बनवायचे नव्हते. हे काही गंभीर नाही. मी परवापर्यंत ठीक होईन कारण संध्याकाळी आमचा खेळ आहे. म्हणूनच कदाचित बाहेर येण्याचा आणि पाच-सहा वेळा स्प्रिंट न करण्याचा कदाचित एक हुशार निर्णय घेतला असेल आणि कदाचित तो आणखी करायचा कारण आमचा एक महत्त्वाचा खेळ येत आहे,” कोहली सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला.

सूर्यकुमार यादवच्या 57 धावा, श्रेयस अय्यरच्या 37 धावा आणि रिषभ पंतच्या 30 धावांच्या आताशी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 185 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठली जी स्पर्धेतील त्यांची सर्वाधिक धावसंख्या ठरली. त्यांनतर यजमान टीम इंडियाने इंग्लिश संघाला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 177 धावांवर रोखले. शार्दुल ठाकूरने 3 तर हार्दिक पांड्या आणि राहुल चाहरने 2 गडी बाद केले. पाच टी-20 सामन्यांनंतर 23 मार्चपासून (मंगळवार) होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ पुणे येथे दाखल होती. शुक्रवारी बीसीसीआयने आगामी तीन वनडे सामन्यांसाठी भारताचा 18-सदस्यीय संघ जाहीर केला होता.