IND vs ENG 4th T20I 2021: ‘स्पष्टपणे रणनीती कामी आली’! Michael Vaughan यांची रोहित शर्माला कॅप्टन्सी देण्याच्या ‘विराट’ निर्णयावर मोठी प्रतिक्रिया
माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

IND vs ENG 4th T20I 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्याच्या अखेरच्या चार ओव्हरसाठी भारताचा (India) नियमित कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli( मैदानातून माघार घेतली आणि उपकर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. यावर माजी इंग्लिश कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी खोचक ट्विट केले आणि विराटच्या निर्णयाला रणनीतीक निर्णय म्हणून संबोधले. इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team) पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 185 धावा केल्या. हा दौरा सुरू झाल्यापासून भारतीय संघावर (Indian Team) अनेक वेळा टीका करणाऱ्या वॉनने अहमदाबादमधील दुसर्‍या डावाच्या शेवटी भारतीय कर्णधार विराटबाबत व्यंग्यात्मक ट्विट केले. कोहली सामन्याच्या 15व्या ओव्हरनंतर मैदानाबाहेर गेला आणि रोहितने जबाबदारी सांभाळत संघाचा विजय निश्चित केला. (IND vs ENG 4th T20I 2021: ‘हिटॅमन’ रोहित शर्माचा भीम पराक्रम, सूर्यकुमार यादवने रचला इतिहास; पहा एका क्लिकवर)

वॉन यांनी विराटच्या निर्णयावर निशाणा साधला आणि लिहिले की, “विराटकडून चांगली कॅप्टन्सी…!! रोहित शर्माला सामील होण्यास आणि त्याच्या युक्तीने स्पष्टपणे काम करण्यास परवानगी मिळाली...” कोहलीचा निर्णय खर्च संघासाठी योग्य सिद्ध झाला कारण रोहितने नेतृत्व सांभाळतच पुढील ओव्हरमध्ये शार्दूल ठाकूरला चेंडू दिला आणि मुंबईकर वेगवान गोलंदाजानेही निराश न करताना आपल्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्स आणि इयन मॉर्गनच्या दोन मोठ्या विकेट काढल्या. शार्दुलने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर स्टोक्सला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. स्टोक्सने 46 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर मॉर्गनला वॉशिंग्टन सुंदरच्या हाती कॅच आऊट केलं. मॉर्गनने 4 धावांची खेळी केली.

दुसरीकडे, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या अटीतटीचा सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 8 धावांची थरारक विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी केली आहे. अशास्थितीत, 20 मार्च रोजी होणारा पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ 23 मार्चपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमने-सामने येतील. तीन सामने सामन्यांची एकदिवसीय मालिका पुणे येथे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाणार आहे.