'विराट कोहली'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'स्पोर्टस्टार'कडून 'स्पोर्टमॅन ऑफ द ईअर' पुरस्काराने सन्मानित
Virat Kohli (Image: PTI/File)

देशातील प्रतिष्ठीत खेळ मॅगझीन स्पोर्टस्टारने (Sportstar) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 'स्पोर्टमॅन ऑफ द ईअर' (Sportsman of the Year) पुरस्काराने सन्मानित केले आहे. स्पोर्टस्टार मॅगझीनचे ब्रँड अॅम्बेसडर आणि दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नने (Shane Warne) हा पुरस्कार विराट कोहलीला प्रदान केला आणि भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या. हा पुरस्कार भारतीय खेळ विश्वात अद्वितीय यश संपादन करणाऱ्या खेळाडूला देण्यात येतो. 'विराट कोहली' वर पुरस्कारांचीही बरसात! क्रिकेट विश्वातील मानाच्या 3 पुरस्कारांनी विराटचा गौरव

यापूर्वी हा पुरस्कार सचिन तेंडूलकर, विश्वनाथन आनंद आणि लिएंडर पेस यांसारख्या दिग्गजांना मिळाला आहे. पुरस्कार निवड समितीत माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, एम.एम. सोमाया, अंजू बॉबी जॉर्ज, अंजली भागवत आणि द हिंदू ग्रुप पब्लिशिंगचे चेअरमन एन. राम यांचा सहभाग होता. लाखो-करोडो फॉलोअर्स असलेला विराट कोहली ट्विटरवर या '5' परदेशी क्रिकेटर्संना करतो फॉलो!

पुरस्कार प्रदान केल्यानंतर कोहलीचे कौतुक करत शेन वॉर्न म्हणाला की, "विराट जगासाठी एक प्रेरणादायी क्रिकेटर आहे. तो त्याच्या मनाचे ऐकतो आणि ज्यावर विश्वास आहे तेच करतो. या पुरस्कारासाठी मी त्याचे अभिनंदन करतो आणि त्याला अधिकाधिक यश मिळावे, अशी इच्छा व्यक्त करतो."