Virat Kohali ( Photo Credits: Twitter)

ICC Cricket Awards 2018:  भारतीय क्रिकेट संघामध्ये 'रनमशीन' अशी ओळख असणारा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohali) यंदा ICC पुरस्कारांमध्येही कमाल केली आहे. यंदा विराट कोहलीने तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये 'Sir Garfield Sobers Trophy for ICC Cricketer of the Year'हा पुरस्कार पटकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तर यासोबतच 'ICC Men’s Test Player of the Year'आणि  'ICC ODI Player of the Year award'ने विराटचा गौरव करण्यात आला आहे. ऋषभ पंत ठरला 'Emerging Player of the Year 2018' चा मानकरी

विराट कोहलीची दमदार फलंदाजी

यंदाच्या वर्षात विराट कोहलीने 55.08 च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत. 13 कसोटी सामन्यांमध्ये 5 वेळेस शतक ठोकलं आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 सामने खेळताना त्याने 1202 धावा केल्या आहेत. 133.55 च्या सरासरीने सहा शतकं ठोकली आहेत. यासोबतच T20I म्हणजे 20-20 च्या सामन्यांमध्ये त्याने 211 धावा केल्या आहेत.

अवघ्या 30 वर्षीय दिल्लीच्या विराट कोहलीने सर्वात प्रथम 2008 साली ICC U19 Cricket World Cup जिंकत क्रिकेट विश्वाला त्याची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. आज दहा वर्षांनी तो जगातील अव्वल फलंदाजांच्या यादीमध्ये आहे. कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार पाडणार्‍या अवघ्या दोन फलंदाजांपैकी विराट एक आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी करणार्‍यांमध्ये तो टॉप 3 खेळाडूंपैकी एक आहे.

सध्या भारतीय संघ न्युझिलंडच्या दौर्‍यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये विजयी कामगिरी केल्यानंतर आता विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उद्यापासून पाच एकदिवसीय आणि तीन T20I खेळण्यासाठी सज्ज आहेत.