File image Rishabh Pant (Photo: Getty Images)

ICC Cricket Awards 2018:  भारतीय क्रिकेट संघातील उभरता यष्टीरक्षक आणि फलंजादपटू ऋषभ पंत ( Rishabh Pant)  ह्याला मंगळवारी (22 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 'एमर्जिंग प्लेअर ऑफ दी इयर 2018' (Emerging Player of the Year 2018) च्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

21 वर्षीय ऋषभ पंतला आयसीसीच्या मतदानाच्या एका अकादमीने 2018 मध्ये प्रथमच कसोटी क्रिकेट संघात पदार्पणाची संधी देण्यात आली. तर विराट कोहली याची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमणुक करण्यात आली होती.

तसेच ऋषभ पंत याने इंग्लड मधील कसोटी सामन्यामध्ये शतक झळकवणारा पहिला युवा भारतीय तरुण ठरला होता .त्याचसोबत एॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 11 सामन्यामध्ये पंतने सर्वाधिक कसोटी सामन्यात सर्वात जास्त झेल घेणारा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक होता.