काल (22 जून) आईसीसी वर्ल्डकप 2019 (ICC Cricket WorldCup 2019) मधील अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला आईसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल मानधनात 25% कपात करण्यात आली आहे. अफणागिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आईसीसीच्या नियमांपैकी आर्टिकल 2.1 चे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (भारताचा विजयी चौकार, अफगाणिस्तान चा 11 धावांनी केला पराभव; मोहम्मद शमी ची -Hat-trick)
आंतरराष्ट्रीय सामन्यात अम्पायरकडे अधिक वेळा अपील केल्यास आईसीसीच्या आर्टिकल 2.1 चे उल्लंघन होते. कालच्या सामन्यात 29 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना एलबीडब्ल्यू (lbw) साठी अपील करताना विराट कोहलीने अम्पायर अलिम दार यांच्याकडे आक्रमकरीत्या अपील केलं. विराट कोहली याने त्यावर केलेले आरोप मान्य करत मानधनातील कपातीला होकार दिला आहे. याच सामन्यात सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विराट कोहली डिआरएस (DRS) च्या निर्णयावरुन अम्पायरशी वाद घालताना दिसला.
ICC Tweet:
#ViratKohli has been found guilty of breaching the ICC Code of Conduct.#CWC19https://t.co/tqYof1z8RI
— ICC (@ICC) June 23, 2019
ANI Tweet:
CWC'19: Viral Kohli fined 25 per cent match fee for excessive appealing
Read @ANI story |https://t.co/qm0Pvuk4Ou pic.twitter.com/id5CrayenC
— ANI Digital (@ani_digital) June 23, 2019
आईसीसी नियमाच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यास खेळाडूस 50% मानधन कपात आणि 1 किंवा 2 डिमेरीट पाईंट्स लागू केले जातात. विराट कोहली याला अजूनपर्यंत 2 डिमेरीट पाईंट्स लागू केले आहेत आणि त्यापैकी पहिला पाईंट साऊथ आफ्रिकेविरुद्ध जानेवारी 2015 मध्ये लागू करण्यात आला होता. तर दुसरा डिमेरीट पाईंट कालच्या सामन्यात लागू करण्यात आला.