IND vs AFG, ICC World Cup 2019: भारताचा विजयी चौकार, अफगाणिस्तान चा 11 धावांनी केला पराभव; मोहम्मद शमी ची Hat-trick
(Image Credit: AP/PTI Photo)

भारत (India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं 225 आव्हान समोर ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करत अफगाणिस्तान संघाला ११ धावा कमी पडल्या आणि 213 धावा एवढी मजल मारू शकला. सलामीवीर हजरतुल्ला जाझई (Hazratullah Zazai) 10 धावांवर मोहम्मद शमी (Mohammed Shami) च्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर गुलबदीन नैब (Gulbadin Naib) आणि रहमत शाह (Rahmat Shah)  यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र नैब हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या गोलंदाजीवर शाह झेलबाद झाला. हार्दिक मागे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने भेदक गोलंदाजी रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) ला बाद करत विरोधी टीमला मोठा धक्का दिला. शिवाय या विश्वकप मध्ये आपला पहिला सामना खेळात असलेल्या मोहम्मद शमी ने 10 ओव्हरमध्ये 40 धावा देत 4 गडी बाद केले. शेवटच्या ओव्हरमध्ये शमी ने लागोपाठ तीन विकेट घेत विश्वकप 2019 ची पहिली Hat-trick साजरी केली.

अफगाणिस्तानविरुद्ध विजया बरोबर भारतीय संघाने विश्वकप मध्ये विजयाचा चौकार मला आहे. भारताने आपले 5 पैकी 4 सामने जिंकले असून त्यांचा 1 सामना पावसामुळे रद्द केला गेला होता.

भारत-अफगाणिस्तान सामन्यात टॉस जिंकत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. विराट आणि केदार जाधव ने अर्ध-शतकी खेळी केली तर के एल राहुल (KL Rahul) 30 धावांवर बाद झाला. राहुल आणि विराट यांनी अर्धशतकी भागिदारी केली. विराट 67 धावांवर बाद झाला.

अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज आक्रमक आक्रमक खेळी करण्यास अपयशी ठरले. अफगाणिस्ताकडून मोहम्मह नबी (Mohammad Nabi) नं चांगली गोलंदाजी केली. त्यानं आपल्या 9 ओव्हरमध्ये 33 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, इतर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.