India Vs Australia 4th Test: अवघ्या 23 धावांवर आऊट होऊनही आज Virat Kohli ने मोडला Sachin Tendulkar चा विक्रम
विराट कोहली (Photo Credit-IANS)

India Vs Australia 4th Test: आज सिडनीमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) दमदार खेळीने भारताची पहिल्या दिवसाची धावसंख्या 300 धावांच्या पार गेली आहे. विराट कोहलीदेखील (Virat Kohli) अवघ्या 23 धावांवर आऊट झाला असला तरीही त्याच्या आजच्या या खेळीमुळे सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीत काढण्यात त्याला यश मिळालं आहे. Cheteshwar Pujara चे दमदार शतक; पहिल्या दिवसाअखेर भारत 303 धावांत 4 बाद

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

विराट कोहलीने आज सिडनी टेस्टमध्ये 19,000 हजार धावांचा आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 399 डावांमध्ये 19 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सचिन तेंडुलकरने हा धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 432 डाव खेळले होते. 2018 च्या सप्टेंबर महिन्यातही विराट कोहलीने सर्वात जलद 18,000 धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. India vs Australia 4th Test: KL Rahul च्या खराब कामगिरीवर सोशल मीडियात टीका, मीम्स व्हायरल

रमाकांत आचरेकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय क्रिकेट संघ हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला होता. दुपारी सचिन तेंडुलकरसह क्रिकेट चाहत्यांनी रमाकांत आचरेकरांना साश्रू नयनांनी निरोप दिला.