भारतीय संघ (Photo Credit/Getty Image)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केल्यानंतर आता त्यांच्या सपोर्ट स्टाफची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी आज, 22 ऑगस्ट रोजी अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली होती. अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने फलंदाजी प्रशिक्षक पदासाठी 3 उमेदवारांची निवड केली आहे. यात, बॅटिंग प्रशिक्षकासाठी माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ता विक्रम राठोड (Vikram Rathour) यांचे नाव आघाडीवर आहे. तर प्राधान्यानुसार संजय बांगर (Sanjay Bangar) दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ की, बांगर यांची सुट्टी होणे निश्चित मानले जात आहे. (स्टिव्ह स्मिथ याला दुखापतनंतर BCCI ने भारतीय खेळाडूंना सांगितले नेक गार्डचे महत्त्व)

संघाचे सहाय्यक कर्मचारी निवडण्याची जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय वरिष्ठ निवड समितीवर आहे. बॅटिंग प्रशिक्षकाची मार्क रामप्रकाश यांचे नाव देखील चर्चेत आहे. आणि आता त्यांच्या व्यावहारिक कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मुलाखतीची दुसरी फेरी घेण्यात येईल, त्यानंतर कोचच्या नावाची घोषणा केली जाईल. दुसरीकडे, सपोर्ट स्टाफमध्ये बलाढ्य स्पर्धा भरत अरुण (Bharat Arun) त्यांच्या बॉलिंग कोचपदावर कायम राहू शकतात. अरुणच्या नेतृत्वात टीम इंडिया एक मजबूत बॉलिंग युनिट बनली आहे. तर, आर. श्रीधर देखील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनून टीमबरोबर राहू शकतात. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील अनेक वेळा म्हणाले आहेत की, संघाचे क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आहे.

शास्त्री यांची पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची पुन्हा निवड केली आणि आता संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचा शोध घेत आहे. टेलीग्राफच्या अहवालानुसार, संजय बांगर यांना फलंदाजी प्रशिक्षकासाठी मुलाखतीत जवळपास 90 मिनिटे प्रश्न विचारले गेले. अहवालानुसार, बांगर यांना संघाचा फलंदाजी क्रम का सेट करता आला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला.