(फोटो सौजन्य-फेसबुक)

Vijay Hazare Trophy 2021 Final: हिमाचल प्रदेशने (Himachl Pradesh) पाचवेळा चॅम्पियन तामिळनाडूचा (Tamil Nadu) पराभव करून विजय हजारे ट्रॉफीचा (Vijay Hazare Trophy) चॅम्पियनशिप जिंकली आहे. तामिळनाडूने अंतिम फेरीत हिमाचल प्रदेशसमोर 315 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हिमाचलने 47.3 षटकांत 4 बाद 299 धावा केल्या होत्या. यानंतर, खराब प्रकाशामुळे, पंचांनी VJD नियमानुसार (वी जयदेवन नियम) सामन्याचा निकाल हिमाचलच्या बाजूने लावला. या नियमानुसार सामन्यात आघाडीवर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाते. त्याचे गुण अनेक स्केलवर मोजले जातात. हा नियम फक्त वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये वापरला जातो. या नियमानुसार, हिमाचल प्रदेश सामन्यात आघाडीवर होता, ज्यामुळे पंचांनी त्यांना विजयी घोषित केले.

हिमाचलसाठी सलामीवीर शुभम अरोराने (Shubham Arora) 131 चेंडूत 136 धावांची नाबाद खेळी खेळली. तसेच कर्णधार ऋषी धवनने (Rishi Dhawan) तुफानी खेळी केली. तो 23 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला.याशिवाय अमित कुमारने 79 चेंडूत 74 धावांचे योगदान दिले. शुभमला त्याच्या शतकीय खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर तामिळनाडूकडून दिनेश कार्तिकने 116 धावा, इंद्रजितने 80 धावा आणि शाहरुख खानने 21 चेंडूत 42 धावा केल्या. तामिळनाडूतर्फे विनय गलेटिया, सिद्धार्थ शर्मा आणि दिग्विजय रंगीने प्रत्येकी एक बळी घेतला, तर कर्णधार ऋषी धवनने तीन आणि पंकज जैस्वालने चार बळी घेतले. निर्णायक सामन्यात हिमाचल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तामिळनाडूला सुरुवातीचे धक्के देऊन गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.

सामन्याच्या पहिल्याच षटकात बाबा अपराजित दोन धावा करून बाद झाला आणि एन जगदीसन नऊ धावा काढून बाद झाला. यानंतर आर साई किशोर 18 धावा करून परतला आणि मुरुगन अश्विनने सात धावा केल्या. मात्र  दिनेश कार्तिक आणि बाबा इंद्रजीतने डाव सांभाळला व नंतर शाहरुख खानने दमदार फलंदाजी करत संघाला 300 धावांच्या पार मजल मारून दिली. उल्लेखनीय आहे की तामिळनाडू संघ पाच वेळा विजय हजारे ट्रॉफीमध्ये चॅम्पियन ठरला आहे. संघाने 2002/03, 2004/05 (संयुक्त विजेते), 2008/09, 2009/10 आणि 2016/17 मध्ये विजेतेपद पटकावले.