IND vs BAN T20I 2019: दीपक चाहर याच्या टी-20 हॅटट्रिकवर BCCI ने केले ट्विट, Netizens ने ट्रोल करत सुधारली चूक, पहा Tweets
दीपक चाहर (Photo Credit: BCCI/Twitter)

दीपक चाहर (Deepak Chahar) याने बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध तिसर्‍याआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात विक्रमी सहा विकेट्ससह भारतीय संघाच्या (Indian Team) मालिका विजयात महत्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाच्या या मनोरंजक विजयानंतर भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआयने) ट्विटरवर दीपकच्या या कामगिरीचे कौतुक करत पोस्ट शेअर केली आणि लिहिले की "आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये हॅटट्रिक घेणारा दीपक हा भारताचा पहिला गोलंदाज बनला आहे. पण, ही माहिती चुकीची होती. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये हॅटट्रिक घेणारा दीपक हा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी एका भारतीय महिला क्रिकेटपटूने हे काम केले आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताची पहिली हॅटट्रिक महिला संघाची फिरकीपटू एकता बिष्ट (Ekta Bisht) हिने घेतली आहेत. बीसीसीआयने या प्रकारात दीपकला हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज असल्याचे म्हटले आणि त्यांची ही चुकी नेटिझन्सच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी बीसीसीआयला धारेवरच धरले. (दीपक चाहर याने बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियासाठी पहिली हॅटट्रिक घेत टी-20 मध्ये केली सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद, वाचा सविस्तर)

बीसीसीआयने त्याला दीपकचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “दीपक चहर आज (रविवारी) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे." याच्यानंतर यूजर्सने बीसीसीआयला ट्रोल केले आणि एकता बिष्टच्या कामगिरीचि आठवणही करून दिली. बीसीसीआयप्रमाणेच त्याचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनीही ट्विटरवर टी-20 मध्ये हॅटट्रिक घेणारा चाहर पहिला गोलंदाज असल्याचे वर्णन करत लिहिले की, "दीपक चाहरने किती शानदार गोलंदाजी केली, फक्त सात धावा देऊन 6 विकेट,आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. या यशाबद्दल अभिनंदन. बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्याबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन. पाहा बीसीसीआयचे ट्विट:

बीसीसीआयच्या या ट्वीटनंतर अखिल भारतीय महिला कॉंग्रेसने (All India Mahila Congress) ट्विटरवर यूजर्सने बिष्टने चाहरच्या आधी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. बीसीसीआयच्या ट्वीटवर अखिल भारतीय महिला कॉंग्रेसने रिट्विट करत म्हटले की, "आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिली हॅटट्रिक घेणार्‍या आपल्या आकडेवारीत एकता बिष्ट विसरली गेली हे बीसीसीआयचे वाईट आहे.होय, दीपक चाहर पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे, परंतु एकता ही पहिली भारतीय खेळाडू आहे जिने 2012 मध्ये हा पराक्रम केला होता." पाहा बीसीसीआयच्या ट्विटवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

पुढील गोष्टींची दखल घेण्यासाठी चांगला वेळः टी -20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा दीपक चहर हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे.

चुकीचे.

पहिला भारतीय पुरुष खेळाडू.

एकताने ऑक्टोबर 2012 ला श्रीलंकाविरुद्ध आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत हॅटट्रिक घेतली होती. या सामन्यात तिने चार ओव्हरमध्ये 16 धावांवर तीन गडी बाद केले, आणि भारताने नऊ विकेट्सने विजय मिळविला. दुसरीकडे, दीपकने रविवारी बांग्लादेशविरुद्ध 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शफीउल इस्लाम आणि19 व्या ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूत मुस्तफिजुर रहमान आणि अमीनुल इस्लाम बिप्लव यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली.