Rohit Sharma (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team:  श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) आता विश्रांतीवर आहे. टीम इंडियाला आता सप्टेंबरमध्ये बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध (Bangladesh National Cricket Team) पुढील मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला  अशा फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल खेळले आहेत.

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)

भारतीय संघाला T20 विश्वचषक जिंकून देणारा आणि काही काळापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला रोहित शर्मा डॉट बॉल खेळण्यात आघाडीवर आहे. रोहितने 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1146 डॉट बॉल खेळले आहेत.

2. मार्टिन गुप्टिल (Martin Guptil)

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने आपल्या कारकिर्दीत 122 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 1033 डॉट बॉल खेळले आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma Record: सेहवागचा विक्रम मोडण्यापासून रोहित शर्मा फक्त 7 षटकार दूर, भारतासाठी ऐतिहासिक विक्रम रचणार!)

3. बाबर आझम (Babar Azam)

या यादीत पाकिस्तान संघाचा टी-20 कर्णधार बाबर आझम चौथ्या स्थानावर आहे. बाबरने 123 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1017 डॉट बॉल खेळले आहेत.

4. विराट कोहली (Virat Kohli)

या यादीत भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीही आहे. विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 877 बॉल्स डॉट खेळले आहेत.

5. डेव्हिड वॉर्नर ()

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने कांगारू संघासाठी 110 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 872 चेंडूत एकही धाव काढलेली नाही.