IND-W vs SA-W T20 Tri-Series: आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार काटेची टक्कर, दोन्ही संघात कोण आहे वरचढ; पहा आकडेवारी
Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील त्रिकोणीय टी-20 मालिकेतील (T20 Tri-Seires) पाचवा सामना आज होणार आहे. रात्री 10.30 वाजता दोन्ही संघांमध्ये हा सामना सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेत सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला अवघे काही दिवस उरले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध तिरंगी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) पूर्ण आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरायचे आहे. मागील मालिकेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत कमकुवत असल्याचे सिद्ध झाले असून 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी संघाला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.

दोन्ही संघांच्या शेवटच्या काही सामन्यांवर नजर टाकली तर दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 1-1 सामने जिंकले आहेत. आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेतून दोन्ही संघ आगामी विश्वचषकासाठी चांगली रणनीती तयार करतील. या मालिकेत टीम इंडियाला आपल्या सर्व प्रमुख खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला लॉरा वोल्वार्ड, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन या खेळाडूंकडून मोठ्या आशा आहेत.

हेड टू हेड आकडेवारी

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांपैकी टीम इंडियाने 9 सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ 4 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना निकालाविना संपला आहे. (हे देखील वाचा: IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार हाय व्होल्टेज सामना, कुठे पाहणार सामना? घ्या जाणून)

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

दक्षिण आफ्रिका: सुने लुस (कर्णधार), सिनालो जाफ्ता, लॉरा वोल्वार्ड, अनेके बॉश, लारा गुडॉल, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, तुमी सेखुखुने.