‘हरमनप्रीत कौर हिला बाहेर करण्याची हीच वेळ...’ भारताची माजी कर्णधार डायना एडुलजी म्हणाल्या - मिताली राज नंतर Captaincy साठी ‘ही’ असेल आघाडीची दावेदार
हरमनप्रीत कौर (Photo Credit: Twitter/ICC)

भारताच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी (Diana Edulji) यांनी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब फॉर्मवर टीका केली आहे आणि म्हटले आहे की, स्टार फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची वेळ आली आहे. हरमनप्रीतने इंग्लंडमध्ये 2017 विश्वचषक (World Cup) स्पर्धेपासून केवळ दोन 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यावेळी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला (India) पराभव पत्करावा लागला, पण तेव्हापासून ती लाइन-अपमधील नियमित सदस्य आहे. एडुल्जी पीटीआयशी बोलताना म्हणाल्या की, हरमनप्रीत 2017 विश्वचषक उपांत्य फेरीदरम्यान केलेल्या 171 धावांवर टिकू शकत नाही आणि सर्व खेळाडूंचे मापदंड समान असले पाहिजेत असे सांगून संघाने कठोर निर्णय घेतला पाहिजे. तसेच मिताली राजने (Mithali Raj) निवृत्ती घेतल्यावर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनली पाहिजे, असेही एडुलजी म्हणाल्या. पुढील महिन्यात होणाऱ्या महिला विश्वचषकानंतर मिताली निवृत्त होण्याची शक्यता आहे.

हरमनप्रीतला गेल्या वर्षी तंदुरुस्तीच्या समस्या होत्या पण प्रभावी WBBL नंतर, तिच्याकडून त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा होती. पण 32 वर्षीय खेळाडूने न्यूझीलंडविरुद्ध 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 20 धावा केल्या असून, एकमवे टी-20 सामन्यात 12 धावा केल्या आहेत. भारताला अद्याप न्यूझीलंडमध्ये खाते उघडता आलेले नाही. त्यांनी एकदिवसीय टी-20 सामना गमावला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. “मी तिच्यापासून खूप निराश आहे. ती माझी आवडती खेळाडू होती पण तुम्ही त्या एका डावावर (2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171) टिकू शकत नाही. ती एका मोठ्या खेळीपासून फक्त एक डाव दूर आहे पण त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

क्राइस्टचर्चमध्ये व्यवस्थापित क्वारंटाईन आणि आयसोलेशनमध्ये दीर्घकाळ राहिलेली स्मृती क्वीन्सटाउनमधील उर्वरित सामन्यांसाठी संघात सामील झाली आहेत. ती एकमेव टी-20 आणि पहिले 2 वनडे सामन्यांना मुकला. "कर्णधार पदाच्या बाबतीतही हरमन कामगिरी करत नसल्यामुळे मितालीनंतर स्मृती सर्व फॉरमॅटमध्ये आघाडीवर आहे. तिला पुढच्या सामन्यासाठी वगळण्यास माझी हरकत नाही. स्नेह राणा ही तिच्यासाठी चांगली बदली आहे,” 66 वर्षीय एडुल्जी पुढे म्हणाल्या. दरम्यान, एडुलजीने शफाली वर्माला दोन सामन्यांसाठी वगळण्याची मागणी केली. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये पदार्पण केल्यापासून शेफालीची आठ सामन्यांत सरासरी 25 आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वर्षांनंतर गोलंदाजांनी तिच्या खेळातील कमकुवतपणा शोधून काढला ज्यामुळे तिला मुक्तपणे खेळता येत नाही.