Tim Southee (Photo Credit - X)

NZ vs ENG 3rd Test 2024: जगात असे फार कमी क्रिकेटपटू आहेत ज्यांना आपल्या देशासाठी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळायला मिळतात. रेड बॉल फॉरमॅटमध्ये प्रदीर्घ कारकीर्दीनंतर जेव्हा एखादा खेळाडू निवृत्ती घेतो तेव्हा तो त्याच्यासाठी भावनिक क्षण असतो. न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साऊदीने (Tim Southee) कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी किवी संघासाठी मैदानात उतरल्यावर असेच काहीसे पाहायला मिळाले. एकीकडे साऊदीला निवृत्तीचा आनंद होता, तर दुसरीकडे पुन्हा कसोटीत खेळता न आल्याचे दुःखही होते. (हे देखील वाचा: NZ vs ENG 3rd Test 2024 Day 1 Stump: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची दमदार सुरुवात, 9 विकेट गमावून केल्या 315 धावा; येथे पहा स्कोअरकार्ड)

मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात

इंग्लंडविरुद्ध हॅमिल्टन येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम साऊदी शेवटची गोलंदाजी करताना दिसणार आहे. साऊदी जेव्हा कसोटी क्रिकेटच्या मैदानावर उतरत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. साऊदीच्या निवृत्तीच्या निमित्ताने त्यांचे कुटुंबीयही मैदानावर उपस्थित होते. आपल्या लाडक्या मुलीला कडेवर घेऊन तो मैदानात उतरला. या वेळी सर्व सहकारी खेळाडू त्याच्या मागे राहिले आणि साऊदीने पुढाकार घेत मैदानात पाऊल ठेवले.

सौदीने आपल्या घातक गोलंदाजीने जगावर केले राज्य 

टीम साऊदी हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. साऊदीने 2008 मध्ये न्यूझीलंडकडून करिअरला सुरुवात केली होती. या 16 वर्षांत साऊदीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या दमदार खेळाने खूप धमाल केली. साऊदीने न्यूझीलंडसाठी 107 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत.

न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या 389 विकेट 

कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर टीम साऊदीने न्यूझीलंडकडून 389 विकेट घेतल्या. याशिवाय साऊदीने या फॉरमॅटमध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सौदीने कसोटीत 7 अर्धशतकांसह 2220 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये साऊदीने 221 विकेट्स घेतल्या आणि टी-20 मध्ये त्याच्या खात्यात 164 विकेट घेतल्या.