सुरेश रैना आणि युवराज सिंह (Photo Credit: Getty)

2 एप्रिल 2011, आजच्या दिवशी 9 वर्षांपूर्वी टीम इंडियाने (India) श्रीलंकेला (Sri Lanka) 6 विकेट्सने पराभूत केले आणि दुसर्‍यांदा एकदिवसीय विश्वचषक (World Cup) जिंकला. भारतासाठी या विश्वचषक विजयाचा स्टार ठरला अष्टपैलू युवराज सिंह ज्याने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि चेंडूने कमालीचा खेळ करत भारताच्या 28 वर्षांचा दुष्काळ संपवला. भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक 1983 मध्ये जेतेपदाचा मान मिळविला, जेव्हा संघाचा कर्णधार महान अष्टपैलू कपिल देव होता. भारताच्या त्या विजयानंतर टीमला 28 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा जेतेपदाचा मान मिळाला. 2011 मध्ये विश्वविजेतेपदी बनलेल्या या भारतीय संघात सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग, युवराज सिंह (Yuvraj Singh), सुरेश रैना (Suresh Raina) आणि झहीर खान सारख्या खेळाडूंचा समावेश होता. सचिनचा तो अखेरचा विश्वचषक होता, त्यामुळे भारतासाठी तो संस्मरणीय ठरला. टीमने सचिनला वर्ल्ड कप विजयासह निरोप दिला. आजच्या त्या दिवसाची आठवण काढत युवी, भज्जी आणि सुरेश रैना यांनी खास ट्विट केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. (2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये एमएस धोनीच्या विजयी षटकाराचे कौतुक केल्याने भडकला गौतम गंभीर, पाहा काय म्हणाला माजी भारतीय फलंदाज)

ऐतिहासिक विजय लक्षात ठेवून युवराज म्हणाला की तो त्या क्षणाचे वर्णन कधिक करून सांगू शकत नाही. युवराज म्हणाला, "तो भारतीयांसाठी किती महत्वाचा क्षण होता. आम्ही फक्त याच साठी जगतो. जय हिंद." या ट्विटसह युवराजने टीम इंडियाचे विश्वचषक खेळाडूंच्या हातात घेतलेला फोटोही शेअर केला.

दुसरीकडे, रैनाने एक फोटो शेअर केला ज्यात संपूर्ण टीम ट्रॉफीसह जल्लोष करीत आहे. रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ""गोष्टी संपतात पण आठवणी कायम राहतात. गर्दी, खळबळ, या सर्वांचा थरार लक्षात ठेवून विश्वचषक उंचावणाऱ्या विलक्षण क्षणाची आठवण काढतोय. अविस्मरणीय. क्रिकेटच्या इतिहासातील या महत्त्वाच्या क्षणाचा त्याचा एक भाग राहिल्याबद्दल धन्यवाद."

हरभजन म्हणाला,"2011 वर्ल्ड कप जिंकणारा. संपूर्ण भारतासाठी हा एक चांगला दिवस होता. अभिमानाचा क्षण"

जेतेपद जिंकण्यासाठी श्रीलंकेनं भारतासमोर 6 विकेट गमावून 275 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला सुरुवातीला दोन मोठे झटके बसले. सचिन आणि सहवाग सुरुवातीलाच बाद झाले. त्यानंतर धोनी आणि गंभीर यांनी 109 धवनची भागीदारी करत टीमला विजयाच्या जवळ नेले. अंतिम सामन्यात गंभीरने 97 धावा केल्या, तर धोनी 91 धावा करून नाबाद राहिला.गंभीरच्या बाद झाल्यानंतर युवराज सिंगने 21 धावांची नाबाद खेळी करत धोनीला साथ दिली आणि भारताला विजय मिळवून दिला.