RR vs GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. दोन्ही संघांचा हा चौथा सामना असेल. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड (GT vs RR Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स संघाने पाच सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला होता. या काळात गुजरात टायटन्सने विजय मिळवला होता. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा एकमेव विजय नोंदवला.

हे देखील वाचा: GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Winner Prediction: राजस्थान रॉयल्सला आणि गुजरात टायटन्स आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

सर्वांच्या नजरा असतीय 'या' दिग्गज खेळाडूंवर

शुभमन गिल: गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज शुभमन गिलने गेल्या 10 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या आहेत. यादरम्यान, शुभमन गिलने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शुभमन गिलची आक्रमक फलंदाजी गुजरात टायटन्ससाठी गेम चेंजर ठरू शकते.

जोस बटलर: गुजरात टायटन्सचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने 349 धावा केल्या आहेत. या काळात जोस बटलरने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर जोस बटलर स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.

रशीद खान: गुजरात टायटन्सचा घातक गोलंदाज रशीद खानने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 14 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, रशीद खानने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये रशीद खानची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.

यशस्वी जैस्वाल: राजस्थान रॉयल्सची घातक फलंदाज यशस्वी जैस्वालने गेल्या 10 डावात 425 धावा केल्या आहेत. यादरम्यान, यशस्वी जयस्वालने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालचे शानदार टायमिंग आणि क्लासिक शॉट्स राजस्थान रॉयल्सच्या बाजूने सामना वळवू शकतात.

रियान पराग: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रियान परागने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. एकदा रियान पराग लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.

वानिंदू हसरंगा: राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज वानिंदू हसरंगाने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. वानिंदू हसरंगाची अचूक गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक आणि संदीप शर्मा.