Tata WPL (Photo: Twitter)

महिला प्रीमियर लीग (WPL 2023) आजपासून (4 मार्च) सुरू होत आहे. या लीगच्या पहिल्या सत्रातील पहिला सामना आज सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स (MI vs GT) हे संघ आमनेसामने असतील. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणार आहे. मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. या संघात हेली मॅथ्यूज आणि नताली सीव्हरसारखे दिग्गज खेळाडूही आहेत. दुसरीकडे, गुजरात जायंट्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन विकेटकीपर-फलंदाज बेथ मुनी करत आहे. गुजरात संघात स्नेह राणा, हरलीन देओल आणि अॅशले गार्डनरसारखे मोठे खेळाडूही आहेत. अशा परिस्थितीत डब्ल्यूपीएलचा हा पहिला सामना खूपच रोमांचक होऊ शकतो.

WPL 2023 चे कसे आहे स्वरूप 

WPL च्या पहिल्या सत्रात 5 संघ सहभागी होत आहेत. राउंड रॉबिन सामन्यांतर्गत, प्रत्येक संघ इतर चार संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल. यानंतर, अव्वल क्रमांकावर असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर सामना होईल आणि त्याचा विजेता अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ असेल. या स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी होणार आहे. म्हणजेच 23 दिवसांत एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.

सामना कधी आणि कुठे पाहणार

Viacom-18 कडे महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क आहेत. त्यामुळे या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 1 आणि स्पोर्ट्स-18 1 एचडी चॅनेलवर केले जाईल. याशिवाय चाहते Jio Cinema अॅपवर या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकतात. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th Test: तिसऱ्या कसोटीतील पराभवाने भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता, कर्णधार रोहित 'या' खेळाडूंना वगळू शकतो)

दोन्ही संघांवर एक नजर

मुंबई इंडियन्स महिला: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, यस्तिका भाटिया, अमेलिया केर, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, प्रियंका बाला, धारा गुजर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिमी बिश्त, सायका इशाक, सोनम यादव.

गुजरात जायंट्स महिला: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा (उपकर्णधार), अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ, शब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर , सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.