NZ vs SL 1s Test: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट पाच दिवस चालते. हा फॉरमॅट वर्षानुवर्षे असाच खेळला जात आहे. मात्र, गॅले स्टेडियमवर होणारी श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यातील कसोटी सामना पाच दिवसांऐवजी सहा दिवसांचा असेल. या सामन्यादरम्यान एक दिवस विश्रांतीचा दिवस देण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकवेळा विविध कारणांमुळे सामन्यांमध्ये विश्रांतीचे दिवस ठेवण्यात आले आहेत. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान झाला. मात्र, हा सामना 23 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 21 सप्टेंबर रोजी विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला आहे.
प्रसिद्धीपत्रकात दिले कारण
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याचे कारण स्पष्ट केले आहे. रिलीजमध्ये लिहिले होते, 'पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला आहे. सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (हे देखील वाचा: Jamie Smith New Record: श्रीलंकेविरुद्ध जेमी स्मिथने ठोकले पहिले कसोटी शतक, सर्वात मोठ्या विक्रमाला घातली गवसणी)
A 6 DAY TEST MATCH NEXT MONTH...!!!
- Sri Lanka Vs New Zealand 1st Test will commence from 18th Sep to 23rd Sep, there'll be a rest day on 21st Sep due to Presidential Elections in Sri Lanka. pic.twitter.com/IStlsx2Zzy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2024
कसोटी मालिकाचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना - 18 ते 23 सप्टेंबर - गॅले
दुसरा कसोटी सामना - 26 ते 30 सप्टेंबर - गॅले
यापूर्वीही सहा दिवसीय कसोटी सामने झाले आहे
गेल्या 20 वर्षात श्रीलंका सहा दिवसांच्या कसोटी सामन्याचे यजमानपदाची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2001 मध्ये त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध सहा दिवसीय कसोटी सामनाही खेळला होता. त्या वर्षी पोया दिवस (पौर्णिमा) असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 2008 मध्ये बांगलादेशने सहा दिवसांच्या कसोटी सामन्याचे आयोजन केले होते.
श्रीलंका सध्या इंग्लंड दोऱ्यावर
श्रीलंका सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. संघाने पहिल्या डावात 236 धावा केल्या होत्या. एकवेळ श्रीलंकेचा संघ 100 धावांच्या आत 6 विकेट गमावून बसला होता. अशा स्थितीत कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि नवोदित मिलन रत्नायके यांनी अर्धशतके झळकावली.