Jamie Smith New Record: श्रीलंकेविरुद्ध जेमी स्मिथने ठोकले पहिले कसोटी शतक, सर्वात मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
ENG vs SL 1st Test: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जेमी स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावळे. या सामन्यात जेमी स्मिथने 148 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला.
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जेमी स्मिथने (Jamie Smith Century) आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावळे. या सामन्यात जेमी स्मिथने 148 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला. स्मिथच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. इतकेच नाही तर जेमी स्मिथ इंग्लंडसाठी कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला आणि त्याने वयाच्या 24 वर्षे 40 दिवसांत पहिले कसोटी शतक झळकावले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावणारा स्मिथ तिसरा यष्टिरक्षक ठरला. त्याच्या आधी केएल राहुल आणि मोहम्मद रिझवान यांनी ही कामगिरी केली होती. या चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावणारा स्मिथ इंग्लंडचा पहिला यष्टिरक्षक ठरला.
is the youngest wicketkeeper to score a Test hundred for England 🤩 #ENGvSL pic.twitter.com/YWudOTJYZK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

