Team India's likely Squad for SA ODIs: दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी असा असून शकतो भारताचा संभाव्य संघ, वाचा सविस्तर
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA ODIs 2022: तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी राहुल द्रविडच्या प्रशिक्षणात टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) आहे. सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे पहिल्या कसोटी सामन्याने भारताने  (India) सकारात्मक सुरुवात केली आहे. कसोटी मालिका सुरू असताना एकदिवसीय संघाचे सदस्य पुढील आठवड्यात आफ्रिकी राष्ट्रात पोहोचतील. मालिकेतील 3 एकदिवसीय सामने अनुक्रमे 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी खेळवले जाणार आहेत. बीसीसीआय (BCCI) या मालिकेसाठी एकदिवसीय संघ जाहीर करण्याच्या तयारीत असताना टीम इंडियाच्या संभाव्य 15 सदस्यीय संघावर खालीलप्रमाणे आहे. (India Tour of South Africa 2021-22: असा असेल भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा; जाणून घ्या वेळापत्रक, Squad, टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती)

सलामीवीर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय ताफ्यात 3 सलामीवीरांची निवड होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेत त्याचा दीर्घकाळचा साथीदार शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यासोबत सलामीला उतरण्याची शक्यता आहे. धवनने आता टी-20 मध्ये आपले स्थान गमावले आहे परंतु त्याने 2021 मध्ये ODI फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. तसेच रुतुराज गायकवाडला आयपीएल 2021 आणि विजय हजारे ट्रॉफी मधील प्रभावी खेळीचे फळ मिळणार आहे. गायकवाडने आयपीएल 2021 मध्ये 635 धावा करून ऑरेंज कॅप पटकावली. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या केवळ 5 सामन्यांमध्ये 603 धावा केल्या. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे.

मधली फळी

माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केली आणि तो 3 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मात्र निवडकर्त्यांनी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली तर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश होणे कठीण दिसत आहे. केएल राहुल आता एकदिवसीय सामन्यांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि फिनिशरची टोपी कायम ठेवेल. मर्यादित षटकांचा उपकर्णधार केएल राहुल आता एकदिवसीय सामन्यांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि फिनिशरच्या भूमिकेत दिसेल. तसेच राहुलच्या रूपात आणखी एका ओपनरचा देखील पर्याय संघाला मिळतो. रिषभ पंत संघाचा विकेटकीपर-फलंदाज असेल.

अष्टपैलू

व्यंकटेश अय्यरनेही एकदिवसीय संघात स्थान मिळविण्यासाठी सज्ज दिसत आहे. 27 वर्षीय खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशसाठी 6 सामन्यात 379 धावा केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच तंदुरुस्त असल्यास अक्षर पटेलला संघात स्थान मिळेल, तर शार्दुल ठाकूर देखील आता टीम इंडियाचा नियमित सदस्य बनला आहे.

गोलंदाज

जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल ज्यात भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचा समावेश असेल. तसेच बॅकअप खेळाडूंच्या यादीत हर्षल पटेल आणि दीपक चाहरचा समावेश होऊ शकतो. दीपक सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी आधीच स्टँडबाय खेळाडूंच्या यादीचा भाग आहे. याशिवाय फिरकी विभागात 2017 पासून एकही वनडे न खेळलेला आर अश्विन संघात पुनरागमन करेल आणि युजवेंद्र चहलने संघात आपले स्थान कायम ठेवेल.

दक्षिण आफ्रिका वनडेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, भुवरेश्वर, मोहम्मद शमी, आर अश्विन आणि युजवेंद्र चहल.