Indian Cricket Team Upcomig Matches: टीम इंडिया मार्च 2024 पर्यंत 'या' संघांशी भिडणार, येथे पहा तीन महिन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
Team India (Photo Credit - Twitter)

Indian Cricket Team Schedule 2024: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला (Team India) एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ केपटाऊनच्या (Cape Town) मैदानावर भिडतील. अशा प्रकारे टीम इंडिया आपल्या नवीन वर्षाची शानदार सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यानंतर टीम इंडिया 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मालिका खेळणार आहे.

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 11 जानेवारीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता मोहालीत हा सामना खेळला जाईल. यानंतर दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 14 जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. त्याचवेळी, या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 17 जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका

अफगाणिस्तान मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series: रोहित ना हार्दिक, टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार! शुभमन गिलचे नाव आले समोर (Watch Video)

इंग्लंडचा भारत दौरा-

पहिली कसोटी (हैदराबाद) – 25 जानेवारी

दुसरी कसोटी (विझाग) – 2 फेब्रुवारी

तिसरी कसोटी (राजकोट) – 15 फेब्रुवारी

चौथी कसोटी (रांची) – 23 फेब्रुवारी

पाचवी कसोटी (धर्मशाला) – 7 मार्च

टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आयपीएल

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आयपीएल 2024 खेळवण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होऊ शकते. मात्र, आयपीएलशी संबंधित कोणतीही अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकणार नाही, कारण टीम इंडियाने केवळ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेपैकी पहिली कसोटी गमावली आहे. आता टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला तरी मालिका अनिर्णित राहील. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनच्या मैदानावर हा कसोटी सामना खेळला गेला.