IND vs AFG T20: भारतीय संघाला जून 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी 11 जानेवारीपासून शेवटची टी-20 मालिका खेळायची आहे. ही तीन सामन्यांची मालिका अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) होणार आहे. ही टी-20 मालिका 11 ते 17 जानेवारी दरम्यान भारतीय भूमीवर खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार यावर सस्पेन्स आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन निश्चित मानले जात असतानाच, आता जिओ सिनेमाचा नवीन प्रोमो आणि त्याच्या पोस्टरने शुभमन गिलचे (Shubman Gill) नाव चर्चेत आणले आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दोघेही जखमी झाले आहेत. तर ऋतुराज गायकवाडही (Ruturaj Gaikwad) फिट नाही आहे. अशा परिस्थितीत रोहितने टी-20 खेळण्यास नकार दिला तरच शुभमन गिलला कर्णधारपद मिळू शकते. शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयची बैठक 2-3 जानेवारी रोजी दिल्लीत होऊ शकते. या बैठकीत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर रोहित आणि विराटशी त्यांच्या टी-20 भविष्याबद्दल बोलू शकतात. (हे देखील वाचा: Virat Kohli Milestone: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर विशेष कामगिरी, सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले)

पाहा प्रोमो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)