Photo Credits: BCCI/Twitter

South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 3rd T20I Match Live Score Update: :  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क  (SuperSport Park) येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा (Team India)  सात विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram)  खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे. (हेही वाचा -  Tilak Varma Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात तिलक वर्माने ठोकले पहिले आंतरराष्ट्रीय शतक )

पाहा पोस्ट -

दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि सलामीवीर संजू सॅमसन खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 219 धावा केल्या.

टीम इंडियासाठी टिळक वर्माने नाबाद 107 धावांची सर्वाधिक झंझावाती खेळी खेळली. या स्फोटक खेळीत टिळक वर्माने 55 चेंडूत आठ चौकार आणि सात षटकार ठोकले. टिळक वर्माशिवाय अभिषेक शर्मानेही शानदार फलंदाजी करत अवघ्या 25 चेंडूत 50 धावा केल्या.

मार्को जेन्सेनने संजू सॅमसनच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले सिमेलेने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अँडिले सिमेलने आणि केशव महाराज यांच्याशिवाय मार्को जॉन्सनने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 220 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-1 अशी आघाडी घ्यायची आहे.