वेस्ट इंडिज दौ-यासाठी आज होणार टीम इंडियाची निवड, या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता
भारतीय संघ (Photo Credit/Getty Image)

वेस्ट इंडिज (West Indies) दौ-यासाठी टीम इंडियामध्ये (Team India) कोणाची वर्णी लागणार याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांना आज पुर्णविराम मिळणार आहे. आज वेस्ट इंडिज दौ-यांसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयची आज महत्त्वपुर्ण अशी बैठक होणार आहे. या दौ-यासाठी ब-याच नवीन चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच महेंद्रसिंग धोनी च्या जागी कोणाची वर्णी लागणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

वेस्ट इंडिज दौ-यात काही सीनियर खेळाडूं ऐवजी नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्यात कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांचा समावेश असेल. तर दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ने याआधीच आपण वेस्ट इंडिज दौ-यात सामील होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धोनीच्या जागी ऋषभ पंत ला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा- महेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ

त्याशिवाय मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनिष पांडेय आणि खलील अहमद यांचाही या दौ-यात समावेश होऊ शकतो असे सांगण्यात येतय.

टीम इंडिया चा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ज्यात तीन T20 International, तीन वनडे आणि दोन टेस्ट सामन्यांचा समावेश असेल.