भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्या निवृत्ती रोज नवनवीन चर्चांना उधाण आले असताना आता धोनी ने स्वत: या विषयावर भाष्य करुन या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. आपण पुढील 2 महिने कोणत्याही क्रिकेट सामन्यासाठी खेळणार नसून पेरा सैन्य रेजिमेंट मध्ये सामील होणार आहोत असे म्हटले आहे. आपल्याला सैनिकांसोबत काही काळ वेळ घालवायचा आहे असे धोनीने बीसीसीआयला सांगितले आहे. विश्वकपमधील भारताचा अंतिम सामना हा धोनीच्या करिअरमधील अंतिम सामना असल्याचे बोलले जात होते. पण अद्याप धोनीकडून यावर कोणतेही भाष्य केले नव्हते.
धोनीच्या म्हणण्यानुसार, आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भारतीय संघासोबत तो वेस्ट इंडिड च्या दौ-यावर नसणार आहे. भारतीय संघ 3 ऑगस्ट ला वेस्ट इंडिज च्या दौ-यावर जाणार आहे. पाहायला गेले तर धोनीने आपल्या निवृत्ती बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र त्यांना काही काल भारतीय सैन्यासोबत घालवायचा असल्याचे त्याचे मॅनेजर अरुण पांडे यांनी सांगितले आहे.
धोनी ला त्याच्या क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आले होते. जेणे करुन धोनी सध्याच्या युवा पिढीला भारतीय लष्करात सामील होण्यासाठी प्रवृत्त करेल.
नोव्हेंबर 2011 मध्ये धोनीला प्रादेशिक सेना च्या लेफ्टनेंट कर्नल म्हणून सन्मानित करण्यात आले होते. आपण भारतीय सैन्यदलात सामील व्हावे असे आपले स्वप्न होते, माझ्या अपघाताने मी क्रिकेटकडे वळालो, असे धोनीने एका मुलाखतीत सांगितले होते.
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड 2019 (ICC Cricket World Cup) मध्ये भारतीय संघ सेमी फायनलमध्ये बाद झाल्यानतर धोनी क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र धोनीने त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्यामुळे त्याचे चाहते ही संभ्रमात होते. त्यातच अलीकडे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करुन धोनीला क्रिकेटमधून संन्यास न घेण्याचा सल्ला दिला होता.
अशातच धोनीने आपल्या चाहत्यांचा अपेक्षाभंग न करता आपल्या करिअरमध्ये एक महत्त्वपुर्ण निर्णय घेऊन पुढील 2 महिने आपल्या देशाच्या सैन्यासोबत व्यतीत करण्याचे ठरवले आहे.