भारतीय संघाने (Indian Team) नामिबियावर (Namibia) 9 गडी राखून विजय मिळवून आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 स्पर्धेच्या मोहिमेचा शेवट गोड केला. उपांत्य फेरीच्या शर्यतीपूर्वी बाहेर पडलेल्या टीम इंडियासाठी (Team India) हा सामना केवळ औपचारिकता होता. याशिवाय दुबई येथे नुकताच संपुष्टात आलेला हा सामना विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधार म्हणून शेवटचा टी-20 सामना होता. विराट कोहली म्हणाला की, कामाचा भार सांभाळण्याची हीच योग्य वेळ आहे आणि भविष्यात तो त्याच उत्साहाने खेळू शकला नाही, तर तो क्रिकेट खेळणे थांबवेल. नामिबियाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 15.2 षटकांत पूर्ण केले. रोहित शर्माने (Rohit Sharma) 37 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुल (KL Rahul) 54 धावा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 25 धावा करून नाबाद राहिले. (IND vs NAM, ICC T20 World Cup 2021: ‘विराट यूग’ अलविदा! अंतिम विश्वचषक सामन्यात नामिबीयाचा पराभव करून टीम इंडियाची प्रशिक्षक रवि शास्त्री यांना विजयी भेट)
नामिबिया विरोधात विजयानंतर कोहली म्हणाला, “भारताचा कर्णधार होणे ही अभिमानाची बाब आहे. मी माझ्यावरील कामाचा भार सांभाळण्याची हीच योग्य वेळ आहे असे वाटले. कर्णधारपदाची ही चांगली जबाबदारी होती. या विश्वचषकात असतानाही आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करू शकलो. आम्ही ज्या प्रकारे शेवटचे तीन सामने खेळलो ती सकारात्मक बाब आहे. आम्ही नाणेफेकीची सबब देणारा संघ नाही. पहिल्या दोन सामन्यात आम्ही निर्भय नव्हतो. मी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानतो. आम्ही त्यांचे आभार मानतो. या संघात त्यांनी एक संस्कृती निर्माण केल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हा सर्व खेळाडूंच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.” भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “जर मला उत्साहाने खेळता आले नाही, तर मी क्रिकेट खेळणे सोडून देईन. मी नेहमी माझे 120 टक्के देण्याचा प्रयत्न करतो.”
दुसरीकडे, नामिबियाविरुद्ध 16 धावांत तीन विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला जडेजा म्हणाला, “मी गोलंदाजीचा आनंद लुटला. कोरड्या चेंडूने गोलंदाजी करणे चांगले. काही चेंडू फिरत होते तर काही सरळ राहिले. मी अश्विनसोबत 10 षटके खेळत आहे आणि तो व्हाईट बॉलने चांगली गोलंदाजी करत आहे. विराट हा एक चांगला कर्णधार आहे. तो नेहमीच आक्रमक खेळ करतो. रवी भाई, भरत भाई आणि श्रीधर भाई यांनी खूप मेहनत घेतली आहे. भविष्यात जो येईल त्याच्या सोबत आम्ही लय कायम ठेवून पुढे जाऊ.”