
कोरोना संकटामुळे टी-20 विश्वचषकाचे (T20 World Cup 2021) आयोजन यूएईत (UAE) करण्यात आले आहे. या स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) यांच्यातील सुपरहिट सामना देखील पाहायला मिळणार आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देणार आहेत. यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. विश्वचषकातील भारताच्या सराव सामन्याचे वेळापत्रकात बदलण्यात आला आहे. त्यानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यात 18 ऑक्टोबरला खेळला जाणार सराव सामना रद्द करण्यात आला आहे.
जुन्या वेळापत्रकानुसार, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 18 ऑक्टोबरला इंग्लंडशी भिडणार होता. त्यानंतर 20 ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार होता. परंतु, नवीन वेळापत्रकानुसार भारतीय संघ 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता (भारतीय वेळेनुसार) ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळेल. तर, दुसरा सामना 20 ऑक्टोबर रोजी दक्षिण अफ्रिकेच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. हे देखील वाचा- एमएस धोनीने पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकली, टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून मानधन घेणार नाही
टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील सर्व सामने दुबई, अबू धाबी आणि यूएईच्या शारजाहमध्ये खेळले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळले जाणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये खेळला जाईल. यावेळी या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 मध्ये भारताने जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला होता. यंदाही भारताकडून अशीच अपेक्षा केली जाते.