मार्कस स्टोइनिस (Photo Credit: Facebook)

विराट कोहलीच्या टीम इंडियाने (Team India) आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. आणि आता त्याला त्याच्यापुढे दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचे (Australia) आव्हान असेल. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी एक चांगली बातमी येताना दिसत आहे, तर ती भारतासाठी चिंतेची बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम अष्टपैलू मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर पुनरागमन करू शकतो आणि या दरम्यान त्याला गोलंदाजी करताना पाहिले जाऊ शकते. स्टोइनिस स्नायूंच्या दुखापतीमुळे (Stoinis Injury) त्रस्त होता, त्यामुळे तो आयपीएल 2021 मधील दिल्ली कॅपिटल्ससाठी काही सामन्यात खेळू शकला नाही. त्याने परतल्यानंतर फलंदाजी केली आहे. सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध अबु धाबीमध्ये सराव सामन्यात त्याने 23 चेंडूत 28 धावा केल्या. आता स्टोइनिसने म्हटले आहे की तो भारताविरुद्ध पुढील सराव सामन्यात गोलंदाजी करताना दिसू शकतो. (T20 World Cup 2021, IND vs AUS: भारताच्या ‘या’ खेळाडूकडे शेवटची संधी, आता चूक झाल्यास संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसावे लागणार!)

सामन्यानंतर स्टोइनिस म्हणाला, “मी आज गोलंदाजी केली नाही, पण ते चांगले चालले आहे. मला वाटते की मी योग्य मार्गावर आहे आणि तयार आहे. मला वाटते की मी पुढच्या सामन्यात गोलंदाजी करू शकतो.” स्टोइनिस गोलंदाजी करणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा दिलासा असेल. सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार मुख्य गोलंदाजांना मैदानात उतरवले होते आणि मिचेल मार्श अष्टपैलू खेळाडू होता, जो महागडा ठरला होता. मार्शने या सामन्यात 53 धावा लुटल्या. दरम्यान, स्टोइनिसने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि स्टीव्ह स्मिथसोबत 48 धावांची भागीदारी केली. अबु धाबी येथे सराव सामन्यात न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्सच्या विजयात स्टोइनिसने 23 चेंडूंत 28 धावा केल्या आणि तो त्याच्या फिटनेसबद्दल उत्साहित दिसला. या सामन्यात अलीकडील दौऱ्यातून बाहेर पडलेल्या वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाने जवळपास पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उभा केला.

अबू धाबी येथे शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सामना बुधवारी दुबईत भारताशी होईल. भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला होता.