T20 World Cup 2021, IND vs AUS: भारताच्या ‘या’ खेळाडूकडे शेवटची संधी, आता चूक झाल्यास संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसावे लागणार!
टीम इंडिया (Photo Credits: PTI)

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्या सराव सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंडचा (England) 7 गडी राखून पराभव केला. हा सामना पाहिल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. भारताच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून प्लेइंग 11 साठी आपला मजबूत दावा सादर केला आहे. याशिवाय काही खेळाडू असे होते ज्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि या खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेतून पत्ता कट होऊ शकतो. तसेच त्यांना कदाचित संपूर्ण स्पर्धेत भारतीय बेंचवर बसून राहावे लागू शकते. यामध्ये आघाडीचे नाव म्हणजे भुवनेश्वर कुमार. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) अडचणी वाढ होताना दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात ब्रिटिशांनी त्याच्या गोलंदाजीवर  भरपूर धावा लुटल्या. भुवनेश्वरने 4 षटकांत 54 धावा दिल्या पण, त्याला एकही विकेट मिळाली नाही. भुवनेश्वरच्या या खराब कामगिरीनंतर तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडताना दिसत आहे. (T20 World Cup 2021, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळणार नाही संधी, माजी दिग्गजने वर्तवला अंदाज)

आता टीम इंडियाचा (Team India) दुसरा सराव सामना आज ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. या सामन्यात भुवनेश्वरची कामगिरी जरी खराब राहिली तरी त्याला संघातून बाहेर केले जाईल हे निश्चित आहे. इतकंच नाही तर त्याने नुकत्याच संपुष्टात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या लेगमध्येही भुवीच्या गोलंदाजीत अजिबात स्विंग दिसला नाही. अशा स्थितीत जर भुवीला संघातून वगळण्यात आले तर शार्दुल ठाकूर संघात स्थान घेण्यास सज्ज आहे. शार्दुलने गेल्या काही वेळेपासून जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि तो गोलंदाजी बरोबरच तो बॅटनेही हिट असल्याचे सिद्ध होत आहे. आयपीएलमध्येही सीएसकेच्या विजयात शार्दुलचा मोठा हात होता. अशा स्थितीत या खेळाडूला बाहेर ठवणे कठीण आहे.

दरम्यान, टी-20 वर्ल्ड भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामने झाले आहेत, ज्यात आतापर्यंत पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे. 24 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ दोन वर्षांनंतर एकमेकांसमोर येणार आहेत. अखेरीस दोन्ही टीम 2019 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केले होते.