India Squad For T20 World Cup: टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा; जाणून घ्या संघात कोणाचा झाला समावेश, MS Dhoni लाही मिळाली मोठी जबाबदारी
team india (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021 India Squad: पुढील महिन्यात बीसीसीआयद्वारे (BCCI) युएई आणि ओमान येथे आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) संघाचे नेतृत्व करेल तर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा उपकर्णधार असेल. लक्षात घेण्यासारखे आहे की टी-20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 10 सप्टेंबरपर्यंत आपले संघ जाहीर करायचे आहेत. बीसीसीआयने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय, राखीव म्हणून तीन खेळाडूंचा समावेश केला केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) फक्त 15 खेळाडूंचा खर्च उचलणार आहे, तर राखीव खेळाडूंचा खर्च संबंधित क्रिकेट बोर्डाना उचलावा लागणार आहे. कोविड-19 महामारीमुळे आयसीसीने (ICC) संघात 23 ऐवजी 30 जणांची मान्यता दिली आहे. यामध्ये सहाय्य्क टीम सदस्यांचाही समावेश आहे. (Pakistan T20 World Cup 2021 Squad: पाकिस्तानने संघाची घोषणा, 2 मोठ्या खेळाडूंना नाही मिळाले स्थान, पाहा संपूर्ण टीम)

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ -

दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तान-न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट-B मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर गट-A मध्ये गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आहेत. पात्रता फेरीपासून प्रत्येक गटातील प्रत्येकी दोन संघ या दोन गटांमध्ये सामील होतील. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. या स्पर्धेत  24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्याने टीम इंडिया आपली मोहीम सुरु करेल. दुसरीकडे, भारताच्या वर्ल्ड कप संघाबद्दल बोलायचे झाले तर खेळाडूंमध्ये प्रत्येक जागेसाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. रोहित शर्मासोबत सलमीसाठी केएल राहुल सोबत, पृथ्वी शॉ, शिखर धवन यांच्यासारखे टी-20 क्रिकेटचे स्टार खेळाडू दावेदार होते. तथापि अखेरीस राहुलने बाजी मारली. तसेच सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रेयस अय्यरच्या नावाची देखील चर्चा रंगली होती.

या 15 खेळाडूंचा झाला समावेश-

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँडबाय खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

एमएस धोनीला मोठी जबाबदारी- 

दरम्यान, या स्पर्धेमध्ये भारतीय संघाबाबतची फार मोठी जबाबदारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला देण्यात आली आहे. एम.एस.धोनी हा टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक असणार आहे. जय शह यांनी याबाबत माहिती दिली आहे.