Photo Credit- X

Sunil Gavaskar Help Vinod Kambli: आजारपण आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या विनोद कांबळीना खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मदतीचा हात दिला आहे. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनच्या माध्यमातून कांबळीला मदत देणार आहेत. मदत स्वरूपात ते कांबळी यांना प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये इतकी रक्कम देतील. विशेष म्हणजे एवढी रक्कम कांबळी (Vinod Kambli) यांना आयुष्यभर दिली जाणार आहे. ही रक्कम त्याना घर खर्चासाठी दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला आणखी 30000 रुपये दिले जाणार आहेत. वैद्यकीय खर्चाची रक्कमही आयुष्यभरासाठी दिली जाणार आहे. ही रक्कम 1 एप्रिलपासूनच सुरू झाली आहे.

वानखेडे स्टेडियमवर झाली भेट

प्रसारमाध्यमांसमोर दोघआंची 11 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात भेट झाली होती. यावेळी कांबळी यांनी गावस्कर यांच्या पायाला हात लावून आशिर्वाद घेतला होता. त्यावेळी कांबळी अत्यंत भावूक झाले होते. त्या भेटीचा परिणाम म्हणून गावस्कर यांच्या संस्थेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्यावेळी गावस्कर यांनी कांबळीना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. वानखेडे स्टेडियमवर दोघांचीही भेट झाल्यानंतर गावस्कर यांनी कांबळीच्या दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यानंतर आता मदतीचा हात दिला आहे.