पाकिस्तानाला आणखी एक मोठा झटका, लसिथ मलिंगा, अॅंजिलो मॅथ्यू, तिशारा परेरा यांच्यासह श्रीलंकेच्या 'या' खेळांडूनी खेळण्यास दिला नकार
Sri Lanka Team( Getty Images)

पाकिस्तानला (Pakistan) आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका (PakistanVsSrilanka) यांच्यात पुढील काही दिवसात सामन्याला सुरुवात होणार आहे. परंतु श्रीलंकेच्या बर्‍याच खेळाडूंनी पाकिस्तानच्या मैदानात एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळण्यास नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत संघातील 10 खेळाडूंनी पाकिस्तान जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यात टी -20 कर्णधार लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यू (Angelo Mathews) आणि तिशारा परेरा (Tishara parera) यांचा देखील समावेश आहे. श्रीलंकेला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौर्‍यावर एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

श्रीलंका बोर्डाच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात 27 सप्टेंबर रोजी पहिला सामना पार पडणार आहे. परंतु सामना सुरु होण्याअगोदरच श्रीलंका संघातील काही दिग्गज खेळाडूंनी माघार घेतला आहे. यामुळे पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहेत. अलीकडेच श्रीलंकेचे क्रीडामंत्री हेरिन फर्नांडो (Harin Fernando) म्हणाले की, बर्‍याच खेळाडूंच्या कुटुंबियांनी सुरक्षा परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान दौर्‍यावर गेलेल्या श्रीलंकेच्या संघावर 2009 साली दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये अनेक खेळाडूं जखमी झाले होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांनी महत्वाची भुमिका घेतली होती. त्यांच्यामुळे श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात बचावले होते. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये बरीच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अयोजन बंद केले होते. हे देखील वाचा-अफगाणिस्तानकडून बांग्लादेश संघाचा पराभव, शाकीब अल हसन याने घेतला मोठा निर्णय

पाकिस्तानच्या संघाने या मालिकेची घोषणा केली आहे. माहितीनुसार, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहीला सामना 5 सप्टेंबर रोजी गधाफी मैदानात खेळला जाणार आहे. त्यानंतरचे दोन्ही सामने याच मैदानात होणार आहे.