SRH vs RCB IPL 2021 Match 6 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, कुठे व कसा पाहणार? जाणून घ्या सविस्तर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

SRH vs RCB IPL 2021 Match 6 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 ची विजयाने सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा सामना आज सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होणार आहे. हैदराबाद आपल्या पाहल्या विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील तर बेंगलोर आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. आरसीबीने (RCB) पाच वेळा गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून यंदाच्या आपल्या मोहिमेची सुरुवात केली तर वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांमधील आयपीएलचा सहावा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर  (Chepauk Stadium) खेळला जाईल. मॅचला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल तर टॉस अर्धातासपूर्वी, 7.00 वाजता होईल. हैदराबाद आणि बेंगलोर आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. (KKR Vs MI 5th Match: कोलकाता नाईट राईडर्सच्या हातातून सामना निसटला; मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी विजय)

सुरुवातीच्या मॅचमध्ये परस्परविरोधी निकालासह दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरतील. आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या बॉलवरील जबरदस्त सामन्यात विजयाने स्पर्धेची सुरुवात केली तर दुसरीकडे, सनरायझर्सना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 187 धावांचा पाठलाग करताना 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करून प्रतिभावान देवदत्त पडिक्क्लच्या पुनरागमनानंतर आरसीबीची फलंदाजी आणखी मजबूत होईल. मागील सत्रात पडिक्क्लने 15 सामन्यांत संघासाठी सर्वाधिक 473धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके देखील ठोकली होती. दुसरीकडे, हैदराबाद चौथ्या क्रमांकावर असलेल्या जॉनी बेअरस्टोच्या फॉर्मशी समाधानी असेल. तथापि, त्यांचे आघाडीचे फलंदाज विशेषत: मनीष पांडेने अधिक आक्रमक फलंदाजी करावी आणि स्कोअरिंग रेट वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा असेल.

पहा हैदराबाद आणि बेंगलोर संघ

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), केन विल्यमसन, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जॉनी बेअरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बासिल थंपी, जेसन होल्डर, जगदीशा सुचित, केदार यादव आणि मुजीब उर रहमान.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्क्ल, हर्षल पटेल, डॅनियल सॅम्स, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झांपा, शाहबाज अहमद, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमीसन, डॅन ख्रिश्चन, सुयेश प्रभुदेसाई, के.एस. भरत आणि फिन अ‍ॅलन.