MI (Photo Credit: IPL)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पाचव्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट राईडर्सला 10 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा इयॉन मॉर्गन याचा निर्णय फसला आहे. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 153 धावांचे दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने चांगली सुरुवात केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळे कोलकाताच्या संघाला हा सामना गमावावा लागला आहे. मुंबईकडून राहुल चहरने जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा मैदानात आले. परंतु ,डी कॉक स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सांभाळला. दरम्यान त्याने रोहितसोबत 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर तोही बाद झाला. संयमी खेळी करणारा रोहितही वैयक्तिक 43 धावांवर माघारी परतला. कमिन्सने त्याला बाद केले. त्यानंतर ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. दरम्यान, आठराव्या शतकार गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या आंद्रे रसल दमदार कामगिरी केली. त्याने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. हे देखील वाचा- KKR Vs MI, 5th Match: आंद्रे रसल चमकला; मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात घेतल्या 5 विकेट्स

ट्वीट-

मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईडर्सचे सलामीवीर नितीश राणा आणि शुभमन गिलने दमाकेदार सुरुवात केली. परंतु, राहुल चाहरने या दोघांनाही माघारी धाडले. त्यानंतर कोलकात्याकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या एकाही खेळाडूला दहा धावांचा टप्पाही गाठता आला नाही. अखेर कोलकाताच्या संघाला 10 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे.