Video: 'वंडर वूमन'लाही कोरोनाव्हायरस चिंता? दक्षिण आफ्रिकी फॅनने इंग्लंडविरुद्ध सेंचुरियन टी-20 मॅच दरम्यान मैदानावर दिली धडक
सेंच्युरियन मध्ये वंडर वूमन (Photo Credit: Facebook)

यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) मधील तिसऱ्या टी-20 सामन्यात 'वंडर वूमन' (Wonder Woman) च्या वेषात एका महिला चाहत्याने दुसर्‍या डावाच्या वेळी खेळपट्टीवर धडक दिली. दुसऱ्या डावाच्या दुसर्‍या षटकात एक फॅन खेळपट्टीवर घुसली आणि कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्याकडे धाव घेतली. यष्टीरक्षकाला एक मास्क दिला आणि संधीचा फायदा घेत झटपट गप्पा मारल्या. फॅनडी कॉकशी बोलत असताना वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) ही आला. दुसर्‍या षटकात इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय बाद झाल्यानंतर, इंग्लंड 223 धावांचा पाठलाग करताना ही घटना घडली. पांढऱ्या रंगाचा मुखवटा घातलेल्या या फॅनचे खेळाच्यामधेच मैदानात आली आणि डी कॉकच्या दिशेने पळली आणि आपल्याकडे असलेल्या बॅगमधून एक मुखवटा त्याला दिला, जो तो आपल्या चेहऱ्यावर घालायलाही गेला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज स्टेन या संभाषणात सामील झाला, ‘वंडर वूमन’ला हाई फाईव्ह दिले. 'वंडर वूमन'ने स्टेनलाही मुखवटा दिला.

सोशल मीडियावर एका चाहत्याने या घटनेचा एक व्हिडिओ ट्वीट करुन लिहिले: “कोरोना व्हायरसपासून आपल्या क्रिकेटिंग नायकाचे संरक्षण कसे करावे??” न्यूयॉर्क टाइम्सच्या मते प्रिटोरियाजवळील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवरील दोन्ही संघांमधील तिसरा टी-20 सामन्यात ग्रीनपीस आफ्रिकाच्या नेतृत्वात निषेध केले जात होते. हा निषेध देशातील वायू प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आला होता. अहवालानुसार “सुपरहीरों”सारखे पोशाख परिधान केलेले असंख्य निदर्शक मैदानात येण्यात यशस्वी झाले. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) 22 चेंडूंत नाबाद 57 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकाने इंग्लंडविरुद्ध अंतिम टी-20 सामन्यात 223 धावांचे आव्हान ठेवले, जे इंग्लंडने सहज गाठले आणि 2-1 अशी मालिका जिंकली. मॉर्गनने 21 चेंडूत अर्धशतक झळकावताना सात षटकार ठोकले आणि इंग्लंडसाठी टी-20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतकाच्या स्वतःच्या विक्रमाची बरोबरी केली. इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात हेनरिक क्लासेनने महतवाची भूमिका बजावली. टॉम कुर्रनच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी क्लासेनने 200 च्या स्ट्राईक रेटने चार षटकार आणि चार चौकार ठोकले. त्याने यजमान संघासाठी सर्वाधिक 66 धावा केल्या. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डन सर्वात महागडा गोलंदाज ठरला ज्याला चार ओव्हरयामध्ये 49 धावांवर एकही विकेट मिळाली नाही.