Sourav Ganguly Health Update: बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली गेली आहे. डॉक्टरांनी असे म्हटले आहे की, अजून एकदा Angioplasty न करणे हा सध्यासाठी सुरक्षित ऑप्शन आहे. वुडलँड्स रुग्णालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार ही माहिती दिली गेली आहे. गांगुली यांनी शनिवारी सकाळी चक्कर आल्याने आणि छातीत दुखण्यास सुरुवात झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मेडिकल बोर्डच्या नऊ सदस्यांनी सकाळी 11.30 वाजता गांगुली परिवारासोबत त्यांच्या प्रकृती संदर्भात चर्चा केली. या बैठकी दरम्यान गांगुली यांचे मेडिकल रेकॉर्ड्स आणि प्रकृती संदर्भात बातचीत झाली.
रुग्णालयाने माहिती देत असे म्हटले आहे की, सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे की दृदयाची योग्य स्थिती पाहता पीटीसीए आणि आरसीए केले जाणार आहे. आणखी दोन ब्लॉकेजेवर ही चर्चा झाली होती. त्यावर अँजिटोप्लास्टीच्या माध्यमातून उपचार केला जाणार आहे. परंतु ते नंतर केले जाणार आहे. बोर्डाचे असे म्हणणे आहे की, सध्या अँजियोप्लास्टी न करणे हाच योग्य निर्णय आहे. कारण सध्या सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या छातीत दुखत सुद्धा नाही आहे. परंतु त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांची त्यांच्यावर करडी नजर आहे. त्याचसोबत घरी जातील त्यावेळी सुद्धा त्यांच्या आरोग्यासंबंधित योग्य ती पावले उचलली जातील.(Sourav Ganguly Health Update: सौरव गांगूली यांच्यावर Echocardiography केली जाईल, हॉस्पिटलकडून 'दादा'च्या प्रकृतीचे अपडेट)
गांगुली यांना शनिवारी चक्कर येण्यासह डोळ्यावर अंधारी येण्याव्यतिरिक्त छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल केले गेले. ही समस्या त्यांना घरात जिम केल्यानंतर उद्भवली. त्यानंतर त्यांनी कौंटुबिक डॉक्टरांना बोलावले असता त्यांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रविवारी दुपारी त्यांच्यावर अँजियोग्राफी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही बड्या लोकांनी सुद्धा सौरव गांगुली यांना फोन करुन प्रकृती संदर्भात विचारपूस केली. गांगुली यांनी मोदी यांना माझी प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले.