भारतातील एक महिला सर्वात लोकप्रिय महिला क्रिकेटपटूंपैकी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) 18 जुलै 2020 रोजी आपला 24 वा वाढदिवस साजरा करतात आहे. भारताचा राष्ट्रीय क्रश बनलेल्या मंधानाने क्रिकेट जगतात आपल्या चमकदार कामगिरीने बरीच मोठी विक्रम नोंदविली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket) दुहेरी शतक झळकावणारी मंधाना ही पहिली महिला खेळाडू आहे. अंडर-19 स्पर्धेत स्मृतीने 150 चेंडूत 224 धावांचा डाव खेळला. गेल्या वर्षी स्मृती वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान 2000 धावा पूर्ण करणारी तिसर्या महिला क्रिकेटपटू ठरली. स्मृतीने 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि भारतीय क्रिकेटमधील सर्वात युवा वयात पदार्पण करणारी क्रिकेटपटूंपैकी एक ठरली. स्मृतीने बांग्लादेश (Bangladesh) महिलांविरूद्ध पदार्पण केले आणि सध्याच्या पिढीतील हा सर्वात मोठी स्टार बनली.
स्मृतीची क्रिकेटपटू बनण्याची कहाणी अगदी रोचक आहे. दोन वर्षाची असताना मोठा भाऊ श्रवणला बघून तिने प्लास्टिक बॅटने खेळण्यास सुरुवात केली. यानंतर भावाप्रमाणेच तिने क्रिकेटपटू बनण्याचे ठरवले. स्मृती आणि भाऊ श्रवणमध्ये चार वर्षाचे अंतर आहे. भाऊ श्रावण प्रमाणेच स्मृतीही उजव्या हाताची फलंदाज होती, पण दोन्ही भावंडांनी डाव्या हाताने फलंदाजी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत स्मृती डाव्या हाताने फलंदाजी करायला लागली. सध्या स्मृतीची गणना अव्वल पाच फलंदाजांमध्ये केली जाते.
स्मृतीने 2013 मध्ये भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 17 व्या वर्षी तिने बांग्लादेशविरुद्ध टी-20 सामना खेळला. त्याच वर्षी तिने वनडेमधेही पदार्पण केले. 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध स्मृतीला पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. मंधानाला डेब्यूच्या 5 वर्षानंतर 2018 मध्ये आयसीसी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट महिला वनडे क्रिकेटपटू म्हणून निवडले गेले. स्मृतीच्या नावावर अनेक विक्रम असून तिने वनडे आणि टी-20 मध्ये 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र, तिने अद्याप दोन कसोटी सामने खेळले असून एक अर्धशतक ठोकले आहे.