Shubman Gill (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा (Team India) स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) वनडे क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये, गिलने प्रथम पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. शुभमन गिल (Shubman Gill) सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. आता गिलला नंबर वन बनण्याची सुवर्णसंधी आहे. टीम इंडिया शुक्रवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे आणि या मालिकेत शुभमन गिल वनडेतील नंबर वन फलंदाज बनू शकतो. जर शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 200 च्या जवळपास धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनू शकतो.

सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आयसीसी वनडे क्रमवारीत 857 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल 814 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करून शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमधला नंबर वन फलंदाज बनू शकतो. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळपट्टीवर होणार बद्दल, आयसीसीने भारताला दिल्या खास सूचना)

मागील पाच डावांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतके

स्टार फलंदाज शुभमन गिलच्या शेवटच्या पाच एकदिवसीय डावांवर नजर टाकली तर तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या पाच डावांमध्ये शुभमन गिलने दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. शुभमन गिल पाचपैकी दोन डावात नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शुभमन गिलने नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावली होती, तर बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. मागील पाच एकदिवसीय डावांमध्ये, शुभमन गिलने अनुक्रमे 67*, 58, 19, 121 आणि 27* धावा केल्या होत्या.

शुभमन गिल तिन्ही फॉरमॅट खेळतो

शुभमन गिल अशा भारतीय फलंदाजांपैकी एक आहे जो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. शुभमन गिलने आतापर्यंत 18 कसोटी, 33 एकदिवसीय आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शुभमन गिलने कसोटीत 966 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1739 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 304 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. शुभमन गिलने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.