(Photo Credit: Getty Image)

वेस्ट इंडिज (West Indies) चे खेळाडू आपल्या मारक खेळीसाठी आणि आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी क्रिकेट विश्वात ओळखले जातात. त्यांचा युवा जलद गोलंदाज शेल्डन कोट्रेल (Sheldon Cottrell) देखील विकेट घेतल्यानंतर च्या सेलिब्रेशन साठी चर्चेत आला आहे. कॉट्रेल हा जमैकाच्या लष्कराचा जवान आहे. जमैका (Jamaica) च्या लष्करामधल्या सहकाऱ्यांना मान देण्यासाठी कॉट्रेल विकेट घेतल्यावर लष्करी जवानासारखा सल्यूट करतो. त्याची ही स्टाईल अनेक जणांच्या ध्यानी-मणी उतरली असून अनेक त्याची जण कॉपी करत आहेत. (IND vs WI, ICC World Cup 2019: टीम इंडिया च्या विजयी रथात पावसाचा खोडा? जाणून घ्या Manchester मधील हवामानाचा अंदाज)

एक लहान मुलगा व मुलगी कोट्रेलच्या स्टाईलची कॉपी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कोट्रेलला या मुलांसाठी त्याच्या नावाची जर्सी देशील का असे विचारले. कोट्रेलने त्यावर उत्तर देताना या दोघांनाही भारत (India) विरुद्धची लढत पाहण्याचे आमंत्रण दिले. आजवर वेस्ट इंडिजकडून खेळताना कॉट्रेलने 15 वनडेमध्ये 20 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, वेस्ट इंडिज चा विश्वकप मधील आव्हान संपुष्टात आले आहे. इंडिजने या वर्ल्ड कपमध्ये 6 मॅच खेळल्या आहेत. यातल्या 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर एक मॅचमध्ये विजय झाला आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाली. इंडिजच्या खात्यात 3 पॉईंट्स आहेत. भारत विरुद्ध सामन्याआधी वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का लागला आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) दुखापतीमुळे विश्वकपमधून बाहेर झाला आहे. रसेलच्या जागी टीममध्ये सुनिल अंबरिस (Sunil Ambris) ची निवड झाली आहे.