IND vs WI, ICC World Cup 2019: टीम इंडिया च्या विजयी रथात पावसाचा खोडा? जाणून घ्या Manchester मधील हवामानाचा अंदाज

आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये सेमीफायनलसाठी ची चुरस वाढत चालली आहे. आतापर्यंत सर्व संघानी आपले सहा ते सात सामने खेळले आहेत. यात भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) चा संघाने एकही सामना गमावलेला नाही आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) चा पराभव केल्या नंतर टीम इंडिया चा सामना संघर्ष करत असलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी होईल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामने मॅन्चेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात खेळला जाईल. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IND vs WI, CWC 2019: इंग्लंड च्या धरतीवर आणखी एक शतक आणि रोहित शर्मा मोडणार विवियन रिचर्ड्स, केन विलियमसन चा हा मोठा विक्रम)

मॅन्चेस्टरमध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस पडला होता. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने टीम इंडिया ला इनडोअर नेटमध्ये सराव करावा लागला होता. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार 27 जूनला होणाऱ्या सामान्य दरम्यान आकाश साफ राहील आणि पाऊस नाही परंतु पावसाची शक्यता 10 टक्के आहे. 2019 च्या विश्वकप मध्ये ४ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत.

वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) मंगळवारी भारताच्या इंडोअर नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुरीकडे,भारत विरुद्ध सामन्याआधी वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का लागला आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) दुखापतीमुळे विश्वकपमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे रसेल न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये खेळला नव्हता. आंद्रे रसेलच्या जागी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये सुनिल अंबरिसची निवड झाली आहे. वेस्ट इंडिजने या वर्ल्ड कपमध्ये 6 मॅच खेळल्या आहेत. यातल्या 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर एक मॅचमध्ये विजय झाला आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाली. इंडिजच्या खात्यात 3 पॉईंट्स आहेत.