भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने विश्वकप 2019 ची सुरुवात आपल्या तुफानी खेळी ने केली आहे. विश्वकपमध्ये भारता (India) ने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यापैकी अफगाणिस्तान (Afghanistan) सामना वगळता रोहितने प्रत्येक सामन्यात धावा केल्या आहेत. रोहित चा फॉर्म हा भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट आहे. टीम इंडिया चा पुढील सामना वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर होईल. या साम्यातही सर्वांच्या नजरा रोहितवर असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केल्यास रोहितच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद होईल. (IND vs WI मॅचआधी विराट कोहली, विजय शंकर ला सल्ला देताना दिसले रवी शास्त्री, Netizens ने विनोदी प्रतिक्रियांनी केले ट्रोल)
विदेशी खेळपट्टीवर चांगला खेळ खेळणे हे कोणत्याही खेळाडूसाठी मुश्किल असते. आजवर इंग्लंडमध्ये फक्त चार विदेशी फलंदाजांनी सर्वाधिक शतक ठोकले आहे. यात वेस्ट इंडिजचा महान खेळाडू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards), भारताचा शिखर धवन (Shikhar Dhawan), रोहित शर्मा आणि न्यूझीलंड चा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) आहे. या चार खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळपट्टी वर प्रत्येकी चार शतक ठोकले आहे. जर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोहित शतकी खेळी करण्यास यशस्वी झाला तर इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक शतक करणारा विदेशी फलंदाज म्हणून रोहितचे नाव अव्वल स्थानी पोहोचू शकते.
दरम्यान, यंदाच्या विश्वकपमध्ये रोहितने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने 5 सामन्यात 320 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकांचा समावेश आहे. रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) विरुद्ध 122 धावा तर पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 140 धावांची खेळी केली होती.