(Image Credit: BCCI Twitter)

5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवत विराट कोहली (Virat Kohli) ची टीम इंडिया सध्या विश्वकप मध्ये अपराजित राहिली आहे. भारत (India) 9 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी दोन सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. अफगाणिस्तान चा पराभव केल्या नंतर, भारताचा सामना वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात खेळाला जाईल. पण या मॅचआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनां ट्रोल करण्यात आलं. (IND vs WI मॅचआधी भुवनेश्वर कुमार ने नेट्समध्ये केली गोलंदाजी, वेस्ट इंडिज विरुद्ध खेळण्यावर गूढ कायम Video)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) ने काल भारताच्या इंडोअर नेट्समध्ये सराव करतानाचे फोटोस सोशल मीडिया वर शेअर केले होते. या फोटो मध्ये शास्त्री कर्णधार कोहली आणि अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) यांना सल्ला देताना दिसत होते. नेटकऱ्यांनी रवी शास्त्री हा हे फोटोज नोटीस केले आणि आपल्या भन्नाट प्रतिक्रियांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला ट्रोल केले.

शास्त्री कोहिली ला सांगतात: कमीत कमी इतका चकणा लागतो एक क्वार्टर सोबत

एवढ्या बॉटल्स पडल्या होत्या... सगळ्या उचलल्या

दरम्यान, विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा बीसीसीआय सोबत करार संपणार होता, परंतु कोचिंग स्टाफला 45 दिवस अजून वाढवून दिले आहे. सध्या विश्वकप मध्ये पाच सामन्यांनंतर भारताने एकी सामना गमावला नाही आहे. सलामीवीर रोहित शर्मा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याने आधीच दोन शतके टोकले आहेत. भारताच्या विजयात गोलंदाजांनी ही महत्वाच योगदान दिले आहे.