WPL 2024 Opening Ceremony: शाहरुख खान, शाहिद कपूरसह 'या' बॉलिवूड स्टार्सनी विमेन्स प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात दाखवली चमक, पाहा व्हिडिओ
WPL 2024 Opening Ceremony (Photo Credit - X)

WPL 2024 Opening Ceremony: शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम (WPL 2024) सुरू झाला आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि पहिल्या सत्रातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आणि शेवटी मुंबईने बाजी मारली. हा सामना सुरू होण्यापूर्वी शानदार उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) यात परफॉर्म केले. त्यांच्याशिवाय शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि कार्तिक आर्यन यांनीही आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने मंचावर खळबळ उडवून दिली. या दोघांनंतर चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी टायगर श्रॉफ आला. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) पाठिंबा दिला.

पाहा व्हिडिओ

शाहरुख खान (Shahrukh Khan)

शाहीद कपूर (Shahid Kapoor)

वरुण धवन (Varun Dhawan)

टायगर श्रॉफ (Tiger Shroff)

सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra)

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)