Game Changer: शाहिद आफ्रिदीच्या विक्रमी शतकापाठी 'सचिन'ची बॅट, आत्मचरित्रात केला खुलासा
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (Photo Credit: twitter/osmanuzair_pak_crik)

क्रिकेटच्या मैदानात सचिनची (Sachin Tendulkar) बॅट एकदा का फिरली की धावांचा पाऊस निश्चित असल्याचं मानलं जातं, या बॅटच्या जादूचा प्रत्यय फक्त सचिनलाच नाही तर पाकिस्तानचा (Pakistan) दमदार फलंदाज शाहिद आफ्रिदी (Shaid Afridi) ला देखील एका मॅच दरम्यान आल्याचं समोर येतंय. आफ्रिदीचं पुस्तक गेम चेंजर (Game Changer) मध्ये त्याने आपल्या क्रिकेटच्या करिअरमधील अनेक आठवणी व किस्से सांगितले आहेत, यातच त्याने 1996 साली श्रीलंकेच्या विरोधी खेळलेल्या वन डे इंटरनॅशनल (ODI) सामन्यात अवघ्या 37 चेंडूंमध्ये विक्रमी शतक पूर्ण केल्याचा किस्सा सांगत, आपल्या या विक्रमात सचिन तेंडुलकरचा अप्रत्यक्ष हात असल्याचं देखील त्याने म्हंटल आहे.

गेम चेंजर पुस्तकात या सामन्याविषयी सांगताना, आपण जे सर्वात जलद शतक पूर्ण केलं त्यावेळी सचिनच्या बॅट चा वापर केला असल्याचा खुलासा आफ्रिदीने केला आहे. खरतर त्यावेळी वकार युनिस ला सियालकोट मधून सचिन सारखी बॅट बनवून घ्यायाची होती ज्यासाठी सचिनने आपली बॅट त्याला दिली होती. मात्र त्याआधी वकार युनिसने ती बॅट आपल्याला दिली व त्याने फलंदाजी करत नॅरोबी मध्ये मी पाहिलं शतक पूर्ण केलं असल्याचं देखील शाहीद याने पुस्तकात सांगितलं आहे. याच सोबत आफ्रिदी त्यावेळी 16 नव्हे तर 21 वर्षाचा होता असा गौप्य्स्फोट देखील पुस्तकात केलेला आहे. T20 Mumbai League: 'मुंबई T20 लीग'मध्ये अर्जुन तेंडूलकर याच्यावर आकाश टायगर्स संघाकडून 5 लाखांची बोली

पहिल्याच बॅटिंगला जोरदार खेळी

इंटरनॅशनल सामन्यात फलंदाजी करण्याची ही आफ्रिदीची पहिलीच वेळ असली तरी आपल्या दमदार खेळाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अवघ्या 40 चेंडूंमध्ये जवळपास 255 च्या स्ट्राईक रेटने 10धावा पूर्ण करत आफ्रीदीने हा विक्रम आपल्या नावे केला होता. याच्या आधी केनिया विरोधी सामन्यात देखील खेळत असताना आफ्रिदीला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती मात्र या वन डे सामन्याला टी२०च्या शैलीत खेळत शाहिदने आपली त्यानंतरच्या सामन्यातील जागा निश्चित करून घेतली.या सामन्याच्या संपूर्ण एक दिवस आधीच आफ्रिदीने स्वप्नात सनथ आणि जयसूर्या या श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर षटकार मारत असल्याचे पहिले होते,असेही म्हंटले आहे.

वयासंबंधी केला खुलासा

पाकिस्तानी संघातला निवृत्त फलंदाज शाहिद आफ्रिदीचं खरं वय काय याबद्दल सगळ्यांना असलेलं कुतुहूल या पुस्तकात संपवलं आहे. माझा जन्म 1975 मध्ये झाला असून पहिल्या सामन्याच्या वेळी आपलं वय 16 नव्हे तर 19 होत मात्र अधिकार्यांकडून नजर चुकीने खोटा दावा केला गेला असल्याची कबुली स्वतः आफ्रिदीने दिली आहे. पण यानंतर देखील अनेकांनी यावर प्रश्न उभारत जर का आफ्रिदीचा जन्म १९७५ ला झाला होता तर त्याच वय 19 नसून 21 असायला हवं होत असा वाद सुरु केला आहे. रोहित पौडेल: छोटा पॅकेट बडा धामाका, 16व्या वर्षीच मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विक्रम

आजवर शाहिद  याने आपल्या मायदेश पाकिस्तान साठी 27 टेस्ट, 398 वनडे आणि 99 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. यानंतर त्याने वर्ल्ड टी20-2016 नंतर इंटरनॅशनल क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. पाकिस्तनच्या माजी कर्णधाराच्या आयुष्यतील अनेक गेम चेंजिंग वळण या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.