T20 Mumbai League: 'मुंबई T20 लीग'मध्ये अर्जुन तेंडूलकर याच्यावर आकाश टायगर्स संघाकडून 5 लाखांची बोली
Arjun Tendulkar | (Photo Credits: Twitter @HomeOfCricket)

मास्टर बास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) क्रिकेट क्षेत्रात नाव कमावण्यासाठी विशेष मेहनत घेत आहे. त्याची ही मेहनत फळाला आली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण मुंबई टी-20 लीगच्या (T20 Mumbai League) दुसऱ्या सत्रातील लिलावात त्याच्या वरिष्ठ गटात प्रवेश झाला आहे. तसंच लिलावात अर्जुनवर आकाश टायगर्स (Aakash Tigers) संघाने 5 लाखांची बोली लावली आहे.

T20 मुंबई ट्विट:

2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली असून पहिल्या सीजनमध्ये लीगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात लीगमध्ये 6 संघांचा समावेश होता. मागच्या सीजनमध्ये नाईट मुंबई उत्तर पूर्व संघाने विजेतपद पटकावले होते.