रोहित पौडेल: छोटा पॅकेट बडा धामाका, 16व्या वर्षीच मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विक्रम
Rohit Paudel and Sachin Tendulkar | (Photo courtesy: archived, edited images)

नेपाळ (Nepal)या भारताच्या शेजारील देशातील लोकप्रिय क्रिकेटपटू रोहित पौडेल (Rohit Paudel) याने क्रिकेट विश्वात मोठी कामगिरी केली आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. नेपाळकडून खेळताना रोहित पौडेल याने 16 वर्ष 146 दिवस इतक्या वयात संयुक्त अरब अमीरात (यूएई) विरुद्ध दुबई येथे शनिवारी पार पडलेल्या सामन्यात ही खेळी केली. या कामगिरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशत ठोकणारा खेळाडू असा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. सचीन तेंडूलकर यांनी ते 16 वर्षे 213 दिवसांच्या वयाचे असताना हा विक्रम केला होता.

रोहितने हा विक्रम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात केले आहे. त्याने सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिदी(Shahid Afridi) याचाही विक्रम मोडीत काढला आहे. शाहिदने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे 217 दिवस इतक्या वयाचे असताना हा विक्रम केला होता. (हेही वाचा, लाखो-करोडो फॉलोअर्स असलेला विराट कोहली ट्विटरवर या '5' परदेशी क्रिकेटर्संना करतो फॉलो!)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सील (ICC)ने दिलेल्या माहितीनुसार रोहित पौडेल याला नेपाळचा भविष्यातील क्रिकेट स्टार म्हणून ओळखले जाते. रोहितने 58 चेंडूंमध्ये 55 धावांची खेळी केली. ज्यामुळे नेपाळ संघ यूएई संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 145 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करु शकला.